पिंपरी -रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर रशियातून परतलेल्या चिंचवडमधील तरुणाचा नारायणपूर रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला. हा तरुण रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता.युद्ध वाढले तर ते रशियातही होऊ शकते या भीतीने तो आपल्या मायदेशी परतला. तो देवदर्शनाला गेला होता. नारायणपूर रस्त्यावरील चिवेवाडी येथे झालेल्या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
किरण ऊर्फ सोन्या अर्जुन कुऱ्हाडे (वय 20, रा. गुरुदत्त कॉलनी क्रमांक चार, वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळगाव मु.पो. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. बारावीला 89 टक्के पडलेल्या किरण याला डॉक्टर व्हायचे होते. त्यासाठी त्याच्या काकांनी प्रयत्नही केले. मात्र वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षासाठी डोनेशनसाठी 90 लाख, वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क 45 लाख, हॉस्टेलसाठी सव्वा लाख आणि मेससाठी 80 हजार असा एकूण एक कोटी 37 लाखांचा खर्च सांगण्यात आला. मात्र शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या किरण याला एवढा खर्च परवडणारा नव्हता. त्यामुळे किरण याने रशियात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. तिथे पहिल्या वर्षासाठी अवघा चार लाख 40 हजारांचा खर्च येत होता.
जानेवारी महिन्यात तो रशियात शिक्षणासाठी गेला. मात्र रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने तेथील शैक्षणिक संस्थेने ऑनलाइन क्लासेस घेण्याचा निर्णय घेतला. किरण हा शिक्षण घेत असलेली संस्था युद्धाच्या बॉर्डरपासून अवघ्या 500 किलोमीटर अंतरावर होती. त्यांच्यासोबत असलेले 10 महाराष्ट्रीयन विद्यार्थी पुन्हा आपल्या घरी आले. मात्र किरण यांना घरी येण्यासाठी पैसे नसल्याने काहीवेळ तो तिथेच थांबला. मात्र रशियासाठी आंतरराष्ट्रीय हद्द बंद करण्याची चर्चा होऊ लागल्याने अखेर त्याच्या वडिलांनी पैसे जमवून त्यास पाठविल्यानंतर तो 16 मार्च रोजी भारतात आला.
बुधवारी (दि. 23) रोजी तो नारायणपूर येथे दर्शनासाठी गेला होता. एका वाहनाच्या पुढे जात असताना समोरून अचानक वाहन आल्याने त्याला अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्याला लवकर वैद्यकीय मदत मिळु शकली नाही, जास्त काळ तो अपघाताच्या ठिकाणी पडलेला होता.अपघात क्षेत्र हे आऊटआँफ कव्हरेज असल्यामुळे आणखीणच अडचणी निर्माण झाल्या. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या किरण याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.किरण ऊर्फ सोन्या अर्जुन कुऱ्हाडे याच्या अपघाती म्रुत्युमुळे कुटुंबातील सदस्य,नातेवाईक व मित्रपरिवार तसेच आळेफाटा, वाल्हेकरवाडी(चिंचवड)परिसरात शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातस्थळी नागरिकांनी पुढाकार घेतल्यास रूग्णांना तात्काळ मदत मिळेल-शिवश्री.राहुल ढेंबरे पाटील
अतीशय दुखःद प्रसंग, स्व.किरण उर्फ सोन्या अर्जुन कु-हाडे याचा अपघात झाल्यानंतर जवळपास दिडतास जागेवरच पडलेला होता. एका अनोळख्या व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत वैद्यकीय मदत कक्षाला सुचित केले. त्यानंतर हाँस्पिटलला उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळपास २४तास म्रुत्युशी झुंज दिल्यानंतर किरणची प्राणज्योत मालवली.अपघात कुठेही घडला तर आपात्कालीन वैद्यकीय मदत कक्ष/अँम्बुलन्स साठी नागरिकांनी १०८ हा नंबर डायल केल्यास तात्काळ मदत मिळेल व आपण केलेला एक काँल सबंधित अपघात ग्रस्ताचा प्राण वाचवु शकेल...
स्व.किरण यास भावपुर्ण आदरांजली...
-शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील,
संस्थापक/प्रदेशाध्यक्ष,
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य
मो. 9579745774

