प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
कोरोनाच्या नियमावलीमुळे गेली अडीच वर्षे केज शहरातील कलाकार व कलाप्रेमी सांस्कृतिक कार्यक्रमापासून वंचित राहिले. या सर्वांना संधी देण्यासाठी 1 मे 22 रोजी महाराष्ट्रदिनाचे
औचित्य साधून केज रोटरीचे 'जल्लोष महाराष्ट्राचा डान्स स्पर्धा ' आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्ष रो बापूराव सिंगण, सचिव अरुण अंजान व संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी केले आहे.
केज शहरातील कलाकार व कालाप्रेमींसाठी गेली अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग नियमावलीमुळे मुक्तपणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करता आले नाही. आता परिस्थिती निवळली असल्याने 1 मे 2022 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत हनुमान मंदिर प्रांगण, वकिलवाडी येथे केज शहर व परिसरातील कलाकार व कलाप्रेमींसाठी या खुल्या डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम नोंदणी करणाऱ्या 25 स्पर्धकांनाच संधी देण्यात येईल ज्यामध्ये लहान गटातील (10 वर्षांखालील) 10 स्पर्धक 11 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील 15 स्पर्धकांना संधी मिळणार आहे. स्पर्धकांनी डांस साठी निवडलेल्या गीतातील फक्त तीन कडवे गीतावर डान्स करायचा आहे.
या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी 30 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच नोंदणी करावी.
नाव नोंदणीसाठी 9423733888 या क्रमांकावर संपर्क साधावा. दिलेल्या मुदतीनंतर किंवा ऐनवेळी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. तरी केज शहरातील जास्तीत जास्त कलाकारांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कला सादर करावी असे आवाहन केज रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे.

