shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बघतोय काय रागानं ऊस घातलाय वाघानं म्हणत शेतकऱ्यांची वाजत गाजत मिरवणुक..!!

प्रकाश मुंडे. |  बीड जिल्हा प्रतिनिधि:-                  मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे . कामाने आणि घाम गाळून पिकवलेल्या ऊस उन्हात वाळून जात आहे . तरीही त्यावर लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाहीत . नोंद असतानाही स्थानिकचे कारखाने ऊस घेऊन जात नाहित.या सगळ्यां कुचंबनल्या शेतकरी वैतागला आहे. यावर सोलापुर जिल्हयातिल कारखान्याची तोड सापडली व गावातील शेतकऱ्यांनी एकच जल्लोस केला. 


यावेळी  शेतकरी संघटनेच्या पूजाताई मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून गावाच्या शिवेतून ट्रॅक्टर पुढे कारखान्याला पाठवून दिला . यावेळी उपस्थित शेतकन्यांनी बघतोस काय रागाने ऊस घातलाय वाघान अश्या घोषणा दिल्या . तलवाडा येथील शेतकरी शेख खेजर म्हणाले की , माझी स्थानिक कारखान्याला नोंद असताना मागील ३ महिन्यापासून सतत संपर्क करूनही कारखान्याकडून तोड मिळाली नाही. त्याचवेळी कारखानदान्यांच्या पक्षात प्रवेश केला की बिगरनोंदीय उस ही कारखाना पान १ वर करत आहे . 


त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . त्यात मुकादम एकरी दहा हजार रुपये घेतल्याशिवाय व तोड एक ते दीड हजार रुपये एका खेपेला द्यावे लागत आहेत . एवढं करूनही  शेतकर्याचा ऊस कारखाना घेत नाही . ट्रैक्टर चालकाला किती  रुपये दिले तरी ऊस नेत नव्हते . जयदेव शिंगणे यांनी  याबाबत प्रयत्न करून  सोलापूर येथील  सिध्येश्वर करखानाची तोड सापडली आहे .   त्यामुळे त्यांच्या येथील शेतकरी शेख  खैसर  व जयदेव शिंगणे सह तलवाडा गावातील शेतकऱ्यांनी ट्रैक्टर बाहेर काढताना  आनंदाने वाजतगाजत गुलाल उधळून मिरवणूक काढली.
close