shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई पदयात्री साठी 51000 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची करण्यात आली व्यवस्था..!

शिर्डी । प्रतिनिधी ( संजय महाजन ) :
शिर्डीच्या ग्रामस्थांनी आणि श्री साईबाबा संस्थान ने यावर्षीचा रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात विधिवत साजरा करण्याचे ठरवले असल्याने यावर्षी विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. साईबाबांच्या पालख्या पायी पदयात्री मंडळ मोठ्या प्रमाणात शिर्डीत येत असतात. मात्र उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने पायी आलेल्या भाविकांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने रामनवमी पालखी स्वागत कमिटीने विविध उपाययोजना करत पदयात्रिंना जेवण, नाष्टा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन पालखी स्वागत कमिटीच्या वतीने सचिन तांबे यांनी केले होते.

 या आवाहनाला प्रतिसाद देत शिर्डीतील प्रतिथयश व्यापारी आणि नगरसेवक पोपट शिंदे आणि राजू व्यवहारे यांच्या सह मित्रपरिवाराने तब्बल 51 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था पालखी घेऊन येणाऱ्या साई भक्तांसाठी करत सावली साठी भव्य मंडप सुद्धा तयार केला आहे. या पिण्याच्या पाण्याचे जलपूजन आज शिर्डीतील ग्रामस्थ रामनवमी कमिटी अध्यक्ष आणि सदस्य यांच्यासह शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हस्ते झाले यावेळी नालासोपारा येथील पालखी चे स्वागत करत साई प्रतिमेची पूजा आणि आरती करण्यात आली. आणि पालखीतील साई भक्तांना पिण्याच्या पाण्याचे साई नामाच्या जयघोषात वाटप करत रामनवमी उत्सवाच्या साई सेवेचा शुभारंभ पोपट शिंदे यांच्या हस्ते झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त या पिण्याच्या पाण्यासाठी शिंदे यांचा मित्रपरिवार केली. राजू लिंगायत औरंगाबाद, अनिल मुसमाडे, अशोक थेटे, देसाई साहेब, गारगोटे साहेब, टोपे साहेब, महिंद्र सिंग खत्री, रोहमारे साहेब यांच्या सह अनेकांनी सहकार्य केल्याचे पो शिंदे यांनी यावेळी सांगितले. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला असून पदयात्रेत साठी मोठी व्यवस्था रस्त्याने ही करण्यात आली आहे. पाण्याचे टँकर ही रस्त्याने राहणार आहे. त्याचप्रमाणे अनेक साई पदयात्री हे अनवाणी चालत येत असतात. त्यामुळे भर दुपारी उन्हाचे चटके पायाला बसू नये म्हणून रस्त्यावर डांबरी रस्त्यावर टँकरद्वारे पाणी मारण्यात येणार आहे. बरं दुपारी साई पदयात्री ना विश्रांती घेता यावी म्हणून काही ठिकाणी मंडप टाकून सावली करण्यात आली आहे. साई पदयात्री ना कुणाचा त्रास होऊ नये म्हणून विविध प्रकाराने सोयी सुविधा निर्माण करण्यात येत असून यावर्षीचे रामनवमी यात्रा साई पदयात्री यासाठी एक आगळी वेगळी अशी ठरणार आहे.
close