shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे श्री.अंबाजी लिंबाजी देवस्थान च्या पुजाराच्या खोलीतील घर उपयोगी साहित्य व किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी.

वडापुरी येथे श्री.अंबाजी लिंबाजी देवस्थान च्या पुजाऱ्याच्या खोलीतील घर उपयोगी साहित्य व किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी.

विजेच्या शॉर्टसर्किटने घटना घडल्याचा अंदाज.

सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथील श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान असून या ठिकाणी भक्त निवास आहे. या भक्त निवासातील एका खोलीमध्ये देवस्थानच्या पुजारी सौ पुष्पा शंकर कोमकर या राहत असून त्यांच्या या राहत्या खोलीमध्ये दिनांक ८ एप्रिल रोजी रात्री दोन ते अडीच या दरम्यान आग लागून घरातील साहित्य व किराणा दुकानाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सौ पुष्पा शंकर कोमकर या श्री.अंबाजी लिंबाजी देवस्थान पुजारी म्हणून काम करीत असून त्या भक्त निवासातील एका खोलीमध्ये पतीसह राहत आहेत. त्यांनी येणार्‍या भाविकांसाठी लागणारे किराणा साहित्य याच्या विक्रीसाठी राहत्या खोलीमध्ये किराणा दुकान स्थापन केले होते. दिनांक ७ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता सध्या उकाडा असल्याने ते खोली बंद करून बाहेरील परिसरामध्ये झोपले असता रात्री दोन ते अडीच च्या दरम्यान खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याची दिसून आले. सदर आग विजेच्या शॉर्टसर्किटने झाल्याचे कोमकर यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात आग असल्याने दोन्ही दरवाजे खुले केले व सौ पुष्पा कोमकर यांनी शेजारील लोकांना हाक मारून सदर आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अतिशय चलाखीने गॅस सिलेंडर तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला नाही तसेच कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु घर उपयोगी साहित्य व किराणा दुकानाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने हे कुटुंब विना आधारित झाले आहे.  या कुटुंबाच्या मदतीसाठी शासन स्तरावर काही मदत मिळावी असे या कुटुंबाची अपेक्षा आहे.
close