बेमुदत धरणे आंदोलन चालू असून आंदोलनाला दोन दिवस पूर्ण झाले असून प्रशासनाने अजून ठोस कारवाई केलेली नाही.
आंदोलन कर्ते :-1) साळुंके गोरक्षनाथ त्रिंबक; 2) रावडे सोपान बाबासाहेब मु. पो. कांगोणी ता. नेवासा जि.अहमदनगर
अहमदनगर । प्रतिनिधी :-
मुख्यालयी राहण्याविषयी माहिती उपलब्ध नसताना पगार, घरभाडे भत्ता बेकायदेशीरपणे मंजुर करणार्या पंचायत समिति,नेवासा मधील दोषी अधिकार्यांवर आणि घेणार्या शिक्षक, ग्रामसेवक आणि इतर अधिकार्यांवर गुन्हा दाखल व्हावा तसेच कांगोणी(ता.नेवासा) गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमधून अनधिकृत नळ कनेक्शन असणार्यांवर आणि त्यांना मदत करणार्या ग्रा.पं. कांगोणी पदाधिकारी आणि अधिकार्यांवर आणि पं.स.नेवासा मधील दोषी अधिकार्यांवर कारवाई होण्यासाठी आंदोलनाचे निवेदन दिलेले असताना त्यानुसार अजूनही दोषींवर कारवाई झालेली नसल्यामुळे
आंदोलन कर्ते :-1) साळुंके गोरक्षनाथ त्रिंबक ; 2) रावडे सोपान बाबासाहेब मु. पो. कांगोणी ता. नेवासा जि.अहमदनगर या आंदोलकांच्या तक्रारींनुसार दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत आजपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन सर्व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी विनंती
आंदोलकांनी केली आहे.
बेमुदत धरणे आंदोलांनातील प्रमुख मागण्या :-
1) जि.प.प्राथ शाळा कांगोणीतील मुख्याध्यापक, शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याच्या तक्रारीची जाणीवपूर्वक अर्धवट चौकशीचा खोट्या माहितीचा बनावट चौकशी अहवाल देऊन शासनाची फसवणूक करणार्या पंचायत समिति नेवासामधील सर्व दोषी अधिकार्यांवर आणि मुख्यालयी न राहणार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
2) पंचायत समिती नेवासा या कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच पंचायत समितीमधील सर्वच विभागातील कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी हे मुख्यालयी राहतात किंवा नाही याबाबत असणारे पुरावे [ भाडे करार, स्वमालकीचे उतारे, ग्रामसभा ठराव, लेखी जबाब, ग्रा.पं. दाखले ] पंचायत समिति, नेवासा येथे उपलब्ध नसताना त्या अधिकारी, कर्मचार्यांचे पगार, घरभाडे भत्ता बेकायदेशीरपणे मंजूर करणार्या पंचायत समिति नेवासामधील सर्व दोषी अधिकार्यांवर आणि बेकायदेशीरपणे पगार, घरभाडे भत्ता घेणार्या शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक व इतर सर्व दोषी अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा. दोन
3) पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाइनमधून अनधिकृत नळ कनेक्शन असणार्या ज्या ग्रामस्थांना ग्रा.पं. कांगोणीकडून नोटिसा दिल्या त्या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना मदत करणार्या ग्रा.पं.कांगोणी आणि पं.स.नेवासातील दोषी अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा.अनधिकृत नळ कनेक्शनच्या तक्रारीचा शासनाची फसवणूक, दिशाभूल करणारा बनावट अहवाल तयार करून हुकुमशाही पद्धतीने तक्रार निकाली काढणार्या पंचायत समिति, नेवासा मधील दोषी अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
निवेदनातील सर्व मागण्या शासनाच्या आणि समाजहिताच्या मागण्या असून संबंधित सर्व अधिकार्यांनी तातडीने योग्य दखल घ्यावी असे निवेदनात आंदोलकांनी नमूद केले आहे.

