shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ओंकारनाथ देवस्थान रांजणी येथे सलग १३ वर्ष गुलाबराव इंगळे परिवाराच्या वतीने जपली अन्नदान व महाअभिषेकाची सेवा .

ओंकारनाथ देवस्थान रांजणी येथे  सलग १३  वर्ष गुलाबराव इंगळे परिवाराच्या वतीने जपली अन्नदान व महाअभिषेकाची सेवा .

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थिती.

इंदापूर तालुक्यातील अनेक मान्यवर होते  उपस्थित .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथील गुलाबराव इंगळे व त्यांचे सुपुत्र राजाभाऊ इंगळे, अमोलराजे इंगळे  यांच्यावतीने गेली १३ वर्षापासून रांजणी येथील ओंकारनाथ देवस्थान या ठिकाणी होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दुपारचे अन्नदान सेवा कार्य होत असून या  दिवशी देवाचा महाअभिषेक इंगळे परिवाराच्या वतीने होत असतो.
 यावर्षी उद्योजक राजाभाऊ इंगळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ संगीता इंगळे सदस्य ग्रामपंचायत बाभूळगाव यांच्या शुभहस्ते महा अभिषेक संपन्न झाला.
 यानंतर महाप्रसाद रांजणी व पंचक्रोशीतील आणि इंदापूर तालुक्यातील तसेच इतर भागातील इंगळे परिवारांचे स्नेही व मित्रपरिवार यांनी उपस्थिती दर्शवून प्रसादाचा लाभ घेतला. 
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थिती दर्शवून ओंकारनाथ देवाचे दर्शन घेतले. यावेळी देवाला साकडे घातले की, राज्यात व देशात कोरोणा सारख्या संक्रमणाचा प्रादुर्भाव येऊ नये, राज्यातील सर्व शेतकरी सर्व जनता सुख समृद्धी मध्ये राहू दे, सर्वांची उन्नती होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. तसेच उपस्थित भाविक भक्तांना संबोधित करताना म्हणाले की, इंगळे परिवार यांची या देवस्थाना विषय असलेली श्रद्धा प्रेम आणि सेवावृत्ती ही गेली १३ वर्षापासून असून अशीच सेवा त्यांच्या हातून घडत जाऊन त्यांच्या परिवाराची भरभराटी होवो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांनी दिली.
याप्रसंगी राजाभाऊ इंगळे छत्रपती उद्योग समूह इंदापूर, गोपीचंद गलांडे गलांडवाडी नं. २,विजय देवकर, पोपट देवकर हिंगणगाव, प्रीतम देवकर वडापुरी, शिवाजी तरंगे तरंगवाडी,  पोपट तरंगे, दादासो गुरगुडे, सुनील गुरगुडे, रांजणी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष भारत आबा मस्के,  राम आसबे इंदापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष भाजप, पोपट भोसले, विठ्ठल मोरे, गणेश पाटील, रमेश पाटील, संतोष मोरे ,किशोर मगर, सुनील राखुंडे, छगन लोंढे, सोमनाथ जावळे, सुखदेव (अंटू) गुरगुडे बाभुळगाव ग्रामपंचायत सदस्य, दादासो भोसले बाभुळगाव ग्रा. सदस्य, दिनेश वायकर ग्रा. सदस्य, बबन इंगळे ,नारायण आसबे ,अजित गायकवाड, यशराज अवताडे, बापू गलांडे ,धर्मेंद्र इंगळे, रवींद्र इंगळे तसेच रांजणी मधील सरपंच उपसरपंच सदस्य आणि माजी सरपंच व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये   माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही सर्वांबरोबर पंगतीत बसून प्रसादाचा आस्वाद घेतला.
close