shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खट्याळ कलाकारांच्या नाटाळ करामतीच्या माध्यमातून ग्रामीण जनतेस विनोदी कला आणि समाज प्रबोधनात्मक संदेश देऊन समाज जागृती घडणार - अमोलराजे इंगळे.

खट्याळ कलाकारांच्या नाटाळ करामतीच्या माध्यमातून ग्रामीण जनतेस विनोदी कला आणि समाज प्रबोधनात्मक संदेश देऊन समाज जागृती  घडणार - अमोलराजे इंगळे.

इंदापूर प्रतिनिधी:खट्याळ कलाकारांच्या नाटाळ करामतीच्या माध्यमातून ग्रामीण जनतेस विनोदी कला आणि समाज प्रबोधनात्मक संदेश देऊन समाज जागृती  घडणार असल्याचे मत भाटनिमगाव येथे काळरान प्रस्तुत खट्याळ कलाकारांच्या नाठाळ करामती या वेबसिरीच्या छायाचित्रकरनचा शुभारंभ  संपन्न (दि.१३)झाला  यावेळी बोलताना अमोलराजे इंगळे म्हणाले.
 या विनोदी वेबसिरीजचा शुभारंभ पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, भाटनिमगाव सरपंच अजित खबाले, राज कुमार येवले क्रेटा केमिकल चे एमडी, युवाउद्योजक अमोलराजे इंगळे, उद्योजक अण्णासाहेब साळुंखे, उद्योजक राजवली पठाण, युवानेते गणेश लोकरे यांच्या शुभहस्ते तसेच भाटनिमगावचे उपसरपंच शकील शेख, चेअरमन पंजाबराव गायकवाड ,माजी सरपंच मनोहर भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब भोसले हे प्रमुख पाहुणे होते. तर काकासाहेब खबाले, सचिन कांबळे, नागेश खबाले, संतोष मगर, विजय शिंदे ,पल्लवीताई देवकर, पांडुरंग देवकर, स्वप्नील शिंदे तसेच ग्रामस्थ व खट्याळ कलाकारांच्या नाटाळ करामतीचे सर्व टीम यावेळी उपस्थित होते.
 या कार्यक्रमाचे आयोजन या वेबसिरीजचे निर्माता- दिग्दर्शक- लेखक बाळासाहेब सुतार, निर्माता डी .ओ. पी. एडिटर रवींद्र लोकरे यांनी केले.
यावेळी युवा उद्योजक अमोलराजे इंगळे म्हणाले की, बाळासाहेब सुतार हे माझे मित्र आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नव्हते की, ते चित्रपट व वेबसिरीज मध्ये काम करतील. निर्मिती करतील. परंतु त्यांच्याकडे असलेली उपजत कला त्यांनी प्रथम चांडाळ चौकडी च्या करामतीतुन दाखवली. त्यावेळी त्या वेबसिरिजच्या उद्घाटनास मी होतो. असा अनुभव असणारे बाळासाहेब सुतार यांचा संपर्क खूप मोठा असून त्यांनी प्रदर्शित केलेले व्हिडिओ लाखोचे  सबस्क्रायबर असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यास उदंड प्रतिसाद मिळाला जातो. त्यांच्याकडे असलेली कला ही या नवीन काढण्यात आलेल्या खट्याळ कलाकारांच्या नाटाळ करामती या वेबसिरिज च्या माध्यमातून ग्रामीण जनतेस विनोदी कला आणि समाज प्रबोधनात्मक संदेश देऊन समाज जागृती त्यांच्या माध्यमातून घडणार असून त्यांच्या या छायाचित्रीकरनाच्या शुभारंभास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि इंगळे परिवाराच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो असे त्यांनी मत व्यक्त केले.

याप्रसंगी  सतीश पांढरे म्हणाले की, ग्रामीण भागातील कलाकार पुढे येत आहेत त्याचा सार्थ अभिमान वाटतो. ग्रामीण भागातील मुलांमध्ये कलागुण चांगली आहेत परंतु ते कलागुण संबंधित माध्यमाद्वारे त्यांचे गुण दाखवले जात नाहीत. इतर मोठमोठे कलाकार आहेत त्यांच्या मुलांचे कलागुण दाखवले जातात तर ग्रामीण भागातील कलागुण  असणाऱ्या मुलांची कला दाखवली जात नाही . परंतु इंदापूर तालुक्यातील बाळासाहेब सुतार यांनी निर्माण करीत असलेल्या वेबसिरिजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळेल. त्यांच्या या वेबसिरिजला मी शुभेच्छा देतो अशा प्रकारचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी अजित खबाले मनोहर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
close