शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक १४ एप्रिल २०२२
प्रहार जनशक्ती पक्षाचे देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष जाहीर..!!
देवळाली शहर अध्यक्ष पदी कुमावत तर राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष पदी वाळुंज यांची निवड..!!
देवळाली प्रवरा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रहार जनशक्ती पक्षाची देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष निवड करणेत आली.
देवळाली प्रवरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष पदी विजय बाळासाहेब कुमावत यांची अध्यक्ष पदी निवड करून प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी प्रमाणपत्र देऊन निवड जाहीर केली, प्रसंगी देवळाली प्रवरा महिला शहर अधक्ष्या भाग्यश्री कदम, उपाध्यक्ष सुरेखा शिंदे, प्रहार दिव्यांग शहर अध्यक्ष सलीम शेख, प्रभाकर कांबळे आदी उपस्थित होते.
त्याच प्रमाणे राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आप्पासाहेब ढुस यांनी राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्षपदी शरद कारभारी वाळुंज यांची व उपाध्यक्ष पदी एकनाथ आनंदा वाणी यांची प्रमाणपत्र देऊन निवड घोषित केली.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष रजनी कांबळे, उपाध्यक्ष अफसाना शेख, वंदना कांबळे, सचिव लैला शेख, प्रभाकर कांबळे, दाजी पुंड, दादाभाई शेख आदी उपस्थित होते.
या प्रसंगी सुनील कदम यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

