shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार दि. २२ एप्रिल २०२२ रोजी, सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा महाआरोग्य मेळावा -डाॅ. संतोष खामकर

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार दि. २२ एप्रिल २०२२ रोजी, सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा महाआरोग्य मेळावा -डाॅ. संतोष खामकर 
इंदापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व
राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार दि. २२ एप्रिल २०२२ रोजी, सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा महाआरोग्य मेळावा असणार आहे. 
या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार असल्याने जास्तीत जास्त  नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. संतोष खामकर यांनी केले आहे. 


या कार्यक्रमासाठी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव कणकवले, 
प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे,  तहसिलदार श्रीकांत पाटील, इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. टी.सरतापे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष खामकर उपस्थित असणार आहेत. 

यामध्ये डिजीटल हेल्थ आय. डी. (युनिक हेल्थ आय. डी.) किंवा आयुष्मान भारत कार्ड  व आवश्यक कागदपत्रे - पासपोर्ट साईज दोन फोटो, केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र मूळ कागदपत्रे व सोबत झेरॉक्स प्रत्येकी दोन प्रती लाभार्त्यांनी आणायचे आहेत. 
यावेळी सर्वरोग मोफत तपासणी विशेषज्ञ डॉक्टरांमार्फत होणार आहे. आशी माहीती डाॅ.संतोष खामकर यांनी दिली,
close