shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्या वतीने शेखर पानसरे यांचा सत्कार संपन्न

समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्या वतीने  शेखर पानसरे यांचा सत्कार संपन्न.

 शेखर पानसरे यांना विशेष  आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सरपंच  धैर्यशील  रणवरे पाटील यांनी केला सत्कार .
इंदापूर प्रतिनिधी:मौजे निमसाखर ता इंदापूर  येथील ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी यांच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले याचेच औचित्य साधून आज  निमसाखर गावचे कार्यक्षम सरपंच  धैर्यशील  रणवरे पाटील यांनी समस्त ग्रामस्थ निमसाखर यांच्या वतीने आज ग्रामपंचायत कार्यालय निमसाखर या ठिकाणी शेखर पानसरे यांचा  सन्मान केला व पाठीवरती शाबासकीची थाप दिली असेच सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आम्ही तुझ्या बरोबर आहोत असे गौरवोद्गार काढले.
 यावेळी निमसाखर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी  भिलारे   ग्रामपंचायतचे सदस्य  राजेंद्र रणमोडे, ग्रामपंचायत सदस्य  सुदाम भोसले, ग्रामपंचायत सदस्य सौ. शहानुर मुलानी, ग्रामपंचायत सदस्या सौ. नीता माने ,ग्रामपंचायत क्लार्क  विशाल रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
close