shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विवाह जमविणाऱ्या पोर्टलवरून करमाळा गावच्या महिलेची फसवणूक


 नेपाळ येथील संशयितासह चौघा विरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी : सुर्यकांत होनप

जेऊर: ९ /   भारत मैटोरमोनी अँपवरून ओळख करून करमाळ्यातील एका महिलेची सात लाख एक हजार 300 रुपयांची फसवणूक केली आहे. ४८ लाख रुपये देण्याचे आमिष दाखून फिर्यादी महिलेकडून नेपाळ येथील संशयित आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे पैसे घेतले आहेत. 

 करमाळ्यातील शिवाजीनगर येथील ४३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात शुक्रवारी (ता. ८) रात्री गुन्हा दाखल झाला आहेयामध्ये फिर्यादी महिलेनी म्हटले आहे की, ‘आठ महिन्यापूर्वी भारत मेटोरमोनी अँपवरून नेपाळ येथील विजय पाटील या संशयित आरोपीशी ओळख झाली होती. फिर्यादीने त्याला परिचय दिला होता. त्यानी भारतात आल्यानंतर तुम्हाला भेटेल या विश्वासावर व्हटसअप चॅटिंग व कॉलवरून त्यांच्यात इंग्लिशमधून बोलणे होत होते. त्यानंतर विजय पाटील यांनी फिर्यादीला सांगितले की, ‘गोवा येथील एसबाउथ रेमिट इन्सूरन्स फायनान्समध्ये 2018 मध्ये 38 लाख रूपये गूंतवलेले आहेत व त्याचे आता 48 लाख रूपये मिळणार आहेत. त्यासाठी मला भारतातील एक विश्वासू व्यक्तीची गरज आहे, त्याच्या अकाउंटवर मला पैसे जमा करता येतील.’ त्यावर ‘तुम्ही मला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबूकची झेरॉक्स व्हटसअपवर पाठवा. ते पैसे तुमच्या नावावर जमा होतील, असे सांगितले.त्यानंतर फिर्यादीला अंकीता अग्रवाल (रा. गोवा) या महिलेचा कॉल आला. तेव्हा ती महिला फिर्यादीला म्हणाली, ‘तुमचे प्रकरण सध्या कोर्टात सूरू असून त्यासाठी वकिलाची फी 31 हजार भरणे आहे, असे सांगुन तिने व्हटसअपदवारे पाठविलेल्या विकास संजय दामोदर यांच्या 31 हजार रूपये पाठविण्यासाठी सांगीतलेत्यावर फिर्यादीने 25 जून 2021 मध्ये विकास संजय दामोदर यांच्या नावे महा र्इ सेवा केंद्र येथुन 31 हजार रूपये पाठविले. त्यानंतर विजय पाटील यांनी व्हट्रसअप कॉल करून प्रकरणाकरीता रिझर्व बँक प्रोसेसिंग फी म्हणून 2 लाख 70 हजार रूपये असुन त्यापैकी 50 हजार रूपये तरी भरावे लागतील, असे सांगुन अकाउंटवर 50 हजार पाठविण्यासाठी सांगीतले. त्यानंतर 5 जुलै 2021 ला 50 हजार पाठविले.तेव्हा फिर्यादीला मेल आला त्यावेळी त्यात नमूद केले होते की, ’48 लाख रक्कम खूप मोठी असल्याने तुमच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करता येत नाही. त्यासाठी कंपनी एक सेक्यूरीटी व्हॅन बूक करणार आहे. त्यासाठी तुम्हाला 1 लाख 65 हजार रुपये भरावे लागतील. त्या गाडीमध्ये तुमचे पैसे घरपोहोच होतील असे सांगितले. त्यानंतर 12 जूलै 2022 ला फिर्यादीने तेवढी रक्कम भरली. त्यानंतर 7 ऑगस्ट 2021 ला फिर्यादीला रबर्ट व्हार्इट (रा. गोवा) याचा मेसेज आला होता. त्याने फायनान्समध्ये डिलीव्हरी बॉय म्हणुन काम करतो व तुमचे पैसे घेवून येणाऱ्या व्हॅनमध्ये येणार असुन त्याने पत्ता विचारला.त्यानंतर १५ तारखेला रबर्ट व्हार्इटचा मेसेज आला होता. तेव्हा त्याने मुंबर्इ येथे पोलिसांनी व्हॉन अडविली असुन पोलिसांनी पैसे असलेला बॉक्स उघडण्याकरीता सांगीतले. तेव्हा त्यांनी त्यास सिक्सुरीटी कोड असल्याचे सांगीतले. रबर्ट व्हार्इट याने फोन करून मुंबर्इ पोलिस त्यांना पोलिस स्टेशनला घेवून आले असल्याचे सांगीतले. त्यानंतर अरूण सिंग (रा. मुंबई) व्यक्तीचा फोन आला तेव्हा त्याने मुंबर्इ पोलिस स्टेशन येथुन बोलत असल्याचे सांगुन बाँक्समध्ये काय आहे? असे विचारले होते. त्यावेळी त्यांना बॉक्समध्ये विम्याचे पैसे आहेत असे सांगीतले. तेव्हा पोलिसांनी सदरचा बॉक्स चेक केला तेव्हा त्यामध्ये स्मगलिंगचे सोने असल्याचे सांगुन सदर बॉक्स सोडवला नाही तर तुमचेवर स्मगलिंगचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात येर्इल व सदरचा बॉक्स सोडावयाचा असल्यास 3 लाख 75 हजार रूपये भरावे लागतील, असे सांगीतले. त्यावेळी रबर्ट व्हाईट नावाचे इसमाने पैसे पाठविण्याकरीता प्रभाकर रामचंद्र थोरवे यांचा अकाउंट नंबर दिला.त्यानंतर 19 तारखेला प्रभाकर थोरवे यांचे अकाउंट नंबरवर नऊ टप्यामध्ये 2 लाख 40 हजार रूपये पाठविले होते. 30 तारखेला विजय पाटीलच्या मोबार्इलवरून मेसेज आला होता. पैसै असेलेला बक्स व व्हन पोलीसांनी सोडली असुन मी उदया तुमच्याकडे पैसे घेवून येत आहे, असे सांगीतले. त्यानंतर 31 तारखेला विजय पाटील याने भारत कस्टम ऑफीसर यांनी गाडी अडविली असुन ओळखपत्राची मागणी करून बक्समध्ये काय आहे ते दाखवा सांगुन बीसीडी आहे का असे विचारत असुन बीसीडी नसल्यास 2 लाख 20 हजार रूपये भरावे लागत असल्याचे सांगत असल्याबाबत सांगीतले.

त्यानंतर पुन्हा 2 लाख रूपये पाठविले होते. 12 तारखेला विजय पाटील यांनी व्हट्रसअपव्दारे पैसे असलेला बक्स घेवून येणेकरीता त्याचेकडे पैसे नसुन पैसे असलेला बाँक्स घेवून येणेकरीता 20 हजार पाठवा नाहीतर पैसे असलेला बक्स रबर्ट व्हार्इट यांचेकडे जमा करतो ते तुम्हाला कंपनीमार्फत बक्स पोहोच करतील असे सांगीतले होते. त्यानंतर 15 हजार रूपये पाठविले.त्यानंतर 29 तारखेला विजय पाटील याने मी तुमचे पैसे घेवून येवू शकत नाही, मी पैसे असलेला बक्स रबर्ड व्हार्इट यांचेकडे देवून मी नेपाळला परत जात आहे असे सांगीतले. 7 सप्टेनबारला 2021 रोजी विजय पाटील याने मी आत्ता नेपाळवरून गोव्याला आलो आहे. पैसे पाठविण्याकरीता मी बकेत जावून विचारपुस केली असुन पैसे पाठविण्याकरीता तुमच्या नावे नविन अकाउंट चालु करावे लागेल व नविन अकाउंट चालु करणेकरीता 20 हजार लागतील असे सांगुन प्रंन्शू कूमार शर्मा यांच्या खात्यात फिर्यादीने 10 हजार पाठविले होते. त्यानंतर विजय पाटील याने पैसे पोहोच करणेकरीता वेगवेगळी कारणे सांगुन अनेकवेळा पैसेची मागणी केली होती.

परंतु माझी फसवणुक होत आहे हे माझे लक्षात आल्याने मी त्यानंतर पैसे पाठविण्याचे बंद केले होते. विजय पाटील हा 23 फेब्रुवारी 2022 पर्यंत फसवणुक झालेली रक्क्म माघारी देतो असे म्हणत होता परंतु त्याने त्यानंतर बोलने बंद केले. यामध्ये विजय पाटील, रबर्ट व्हार्इट, अंकिता अग्रवाल, अरूण सिंग यांनी 48 लाख मिळवण्याकरीता भारतातील विश्वासु लाभाथ्री पाहीजे असे सांगुन मला 48 लाख रूपये मिळवून देणेकरीता वेळोवेळी विकास संजय दामोदर, मंगला एंटरप्रायजेस, प्रभाकर रामचंद्र थोरवे व प्रंन्शू शर्मा यांचे खात्यावर पैसे मागवून घेवून 7 लाख 1 हजार 300 रूपये घेवून फसवणूक केलेली आहे. यामध्ये विजय पाटील, रबर्ट व्हार्इट, अंकिता अग्रवाल, विकास संजय दामोदर, मंगला एंटरप्रायजेस, प्रभाक र रामचंद्र थोरवे व प्रंन्शू शर्मा या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .
close