shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर येथील ईदगाह मैदानाची स्वच्छता करा-. जिल्हाध्यक्ष आरिफ भाई शेख यांची मागणी..

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २४-४-२०२२

           अहमदनगर येथील औरंगाबाद महामार्गावरील कोटला येथील ईदगाह मैदानाची मुस्लिम समाजाचे पवित्र सण रमजान ईदची नमाज येथे पठण केली जाते. तेथे खूप अस्वच्छता झालेली आहे. तरी तेथे स्वच्छता करावी अशी मागणी आरिफभाई शेख जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख  कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ अहमदनगर यांनी महानगरपालिका आयुक्तांना केलेली आहे.

 तसेच तेथे ईदच्या दिवशी नमाजासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हात पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी आणि त्या दिवशी वीज पुरवठा खंडित करू नये वीजपुरवठा चालूच ठेवावा अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते आणि कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष मा. एन.एम.पवळे साहेब आणि विभागीय अध्यक्ष ना. म.साठे आणि जिल्हा अध्यक्ष के.के. जाधव यांनी केली आहे
close