लातूर । प्रतिनिधी :-
महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त व वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त तळेगाव दाभाडे, पुणे येथील डाॅ.राममनोहर लोहीया समाजवादी विद्यापीठ, पी.डिमेलो भवन, १६३, कडोलकर काॅलनी, तळेगाव दाभाडे, ता.मावळ, जि.पुणे येथील सभागृहात संघटनेच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय परिसंवाद शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात दोन दिवसीय वैचारिक जागर परिसंवादात वैचारिक व सामाजिक क्षेञातील, चळवळीतील नामवंत कृतिशील व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. परिसंवादातील विषय हे वास्तववादी, अत्यंत गरजेचे व लोकशाही संविधानिक मूल्यांचा गाभीर्यपूर्वक विचार करून देण्यात आले आहेत.
दि.७ आणि ८ मे ला आयोजित या शिबीरातून महाराष्ट्रातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष तथा ओबीसी, विजेएनटी बहुजन परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. कल्याणरावजी दळे साहेब, मा.प्रा.लक्ष्मण हाके राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य, मा.डाॅ.एस.टी.धोञे, प्रा.मकरंद गिरी, लातूर, डाॅ.अशोक बंडगर, औरंगाबाद, मा.प्रविण चव्हाण नेपाळ, मा.भरत विटकर, काॅ.मेधाताई थत्ते, डाॅ.संजय दाभाडे, डाॅ.दत्ता कोहिनकर, प्रा.श्रीकांत मुद्दे, प्रदेशाध्यक्ष राकेशजी विटकर साहेब संबोधित करतील. विविध सञांदरम्यान सकाळी १० ते राञी ९ वाजेपर्यंत शिबिरात संघटन विचारसरणी, संघटन बांधणी तसेच राजकारण आणि समाजकारणाच्या अनुषंगाने प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.
कोरोना महामारीनंतर संघटनेच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरावर एवढ्या भव्य स्वरूपात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही काळात संघटनेने जिल्हानिहाय संघटनबांधणी तसेच कॅडर निर्मितीवर विशेष भर दिला आहे. वचनबद्ध तसेच शिस्तबद्ध कॅडरच संघटनेची शक्ती आहे. अशात सामाजिक परिवर्तनासाठी कॅडरचे प्रशिक्षण महत्वाचे आहे. संघटनात्मक बांधणी तसेच 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' च्या अनुषंगाने कॅडरला अर्थात सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना मार्गक्रमण करण्यासाठी हे परिसंवाद शिबीर महत्वाचे ठरेल. असा विश्वास प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी व्यक्त केला.
परिसंवाद शिबिरात डाॅ.श्रावण रॅपनवाड, मा.रामचंद्रजी मंजूळे, मा.सितारामशेठ शिंदे, मा.महादेव कुसाळकर, मा.अशोक कुलाल सर, मा.भाऊलाल पवार, मा.जगन्नाथ फुलारे, मा.दिलीप गुंजाळ,मा.रमेशजी जेठे
मा.किसन रॅपनवाड, मा.संजय देवकर, मा.लक्ष्मणजी बामणे,मा.संदीप कुसाळकर, मा.कैलास पवार, मा.श्रीपाद घोडके, मा.बी.के.गायकवाड, रमाकांत मुद्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश युनिटचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित राहतील अशी माहिती मा. श्रीकांतजी मुद्दे यांनी निवेदनातून दिली आहे. तद्वतच हा वैचारिक जागर घालणारा येणा-या काळाची पावले ओळखून, सामाजिक भान ठेवून भविष्यातील समाजाचे वास्तव चिञ व अडचणी व त्यावरील उपाय यासंदर्भात सामाजिक जागर करण्याचा विशेष प्रयत्न या परिसंवादाच्या माध्यमातून घडवून आणला जाईल आणि म्हणून या जागर परिसंवादास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही यावेळी श्रीकांत मुद्दे यांनी केली आहे.

