राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २६-४-२०२२
पुढील आठवड्यात हिंदू धर्मियांचा अक्षय तृतीया आणि मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद या महत्त्वाच्या सणानिमित्त राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली,कोणत्याही धर्मियांचे सण-उत्सव साजरे करताना कोणतेही जातिय तेढ निर्माण होऊ नये, प्रत्येक जाती - धर्मात सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केले.
मागे काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मस्जिदीवरील भोंग्याबाबत बोलतांना सांगीतले होते की जर ३ मे पर्यंत मस्जिदीवरचे भोंगे उतरवले गेरे नाही तर मनसैनिक अशा मस्जिदींसमोर त्यापेक्षाही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवतील त्यांच्या या वक्तव्यावरुन या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करुन राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर दिनांक ३-५-२०२२ रोजी मस्जीदींसमोर हनुमान चालीसा लावण्याबाबत चर्चा करण्यात आली,तसेच शहरातील सर्व मस्जिदींचे मौलाना,धर्मगुरू, पदाधिकारी, हिंदू -मुस्लिम समाज बांधव,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,शांतता कमेटीचे सर्व सदस्य यांना आमंत्रित करुन त्यांचे मत जाणुन घेण्यात आले.
यावेळी मस्जीदींच्या कमेट्यांकडुन असे मत मांडण्यात आले की,मा. सुप्रीम कोर्ट व राज्य शासनाने जी गाईडलाई्न्स ठरवून दिली आहे त्याचे पालन आम्ही करु,तसेच मनसे पदाधिकाऱ्यांकडुन देखील शाश्वती देण्यात आली की शहरात आजपावेतो सर्व हिंदु -मुस्लिम नेहमी एकोप्याने राहिले व यापुढे देखील असेच एकोप्याने राहतील, आम्हाला हनुमान चालिसा लावायचा असल्यास आम्ही मुस्लिम बांधवांच्या अजाननंतर लाऊ व शहरातील जातीय सलोखा कायम ठेऊ,असे मनसे पदाधिकाऱ्यांकडून आश्वासनही देण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की, या गावात माझी बदली झाल्यापासुन कोणतीही जातीय भांडणे झाले नाही,शहरातील सर्व नागरीक जातीय सलोखा राखून सामाजिक एकोप्याने राहतात, या पोलीस स्टेशनला हिंदू- मुस्लिम (एच.एम.) सारखे गंभीर गुन्हे दाखल नाहीत,यावरुनच कळते की राहाता शहरात जातीय सलोखा किती पाळला जातो, प्रत्येक समाजात काही माथेफिरु असतात त्यास हिंदु व मुस्लिम समाज कसा अपवाद असु शकेल ? मात्र अशा माथेफीरुंचा योग्य बंदोबस्त करणेकामी पोलिस प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे,माझा फोन २४ तास चालु असतो,कोणासही शहरात काही आक्षेपार्ह तथा चुकीचे होत असल्याची जाणिव होताच त्यांनी तात्काळ आम्हास कळवावे, तथा आपल्या शहराची शांतता आणि सामाजिक सलोखा कसा जपता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असणे गरजेचे असल्याचेही यावेळी पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड म्हणाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार मुश्ताकभाईशहा, राजु पठाण,गुलशेर शेख,मुन्ना शहा,इलियास शहा,मुसा बेग, समिर बेग,हाजी अब्दुल, इब्राहिम इनामदार,सादिक शहा,जाकीर शेख,सुधाकर वाघमारे,समीर शेख,मौलाना रऊफ,राजेश लुटे, विजय मोगले,रामनाथ सदाफळ, सुलेमान शेख,अशपाक तांबोळी,आदींसह हिंदू - मुस्लिम बांधव तथा पत्रकार उपस्थित होते.

