बा, ची ऑडिओ क्लिप व्हाईलर झाल्याने सोनईत खळबळ
प्रतिनिधी, मोहन शेगर, सोनई
दि १६ रोजी गणेशवाडी येथील राजेंद्र रायभान मोहिते व सोनई येथील एका अल्प वयीन मुलास कारण नसताना बेडी घालुन शिवीगाळ केली. तसेच राजेंद्र मोहिते व त्या अल्पवयीन मुलास कुठलाही गुन्हा दाखल नसतांना अमानुष पणे मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ सोनई पोलीस ठाण्यावर युवकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
पोलीस यंत्रणेने या माघील मास्टर माईंडला शोधण्याची आवश्यकता आहे. याची ऑडियो क्लीप व्हायरल झाल्याने या माघे कुणाचे लागेबाधे होते...? याची माहिती सर्वांना माहीती झालीं आहे.पब्लीक ने कायदा हातात घेण्यापेक्षा पोलीस यंत्रणेने यावर तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा सोनईकरांची आहे. मोहिते आणि अल्पवयीन मुलास इतक्या कठोर पणे वीना कारण मारहाण करण्या माघील गौडबंगाल काय ? किंवा यांच्या मागे आजुन कोणाचे डोके आहे हे समजेलच.
पोलीसांचा अशा चमकोगिरी कामगिरी मुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोलीस कुणाच्या हाताचे बाहुले बनले आहे. असे गेल्या दहा-बारा वर्षांपासून जातीय तेढ निर्माण करणारे, समाजात दुफळी निर्माण करणारा, ज्याच्या नावांची ऑडिओ क्लिप वायरल झाल्याने बा.बा.. बा... चे खरे बिंग फुटले.
हाच तो पोलीस कर्मचारी बा बा बा च्या सांगण्या वरुन राजकिय शडयंत्र रचुन गोरगरिबांना पोलिसां मार्फत डांबुन मारहाण केली जाते. असे अनेक प्रकार सोनई पोलीस ठाण्यात घडवलेले आहे. या बा** बा** बा च्या प्रतापाने विनाकारण सर्वसामान्यांना पोलीसांचा प्रसाद मिळतो.
सदर कर्मचारी एकाच ठिकाणी दहा ते बारा वर्षां पासुन एकाच ठिकाणी कोणाच्या आशीर्वादाने सोनई पोलिस स्टेशनला नोकरी करीत आहे. यामागचे गौडबंगाल काय, गणेशवाडी,सोनई मारहाण प्रकरणात याच बा**बा*** बा*** चा हात असल्याचे बोलले जात आहे. अशा बा नावाच्या पोलिस कर्मचऱ्यांनी अनेक युवकांचे भवितव्य बरबाद केल्याचा आरोप केला जात आहे. या बा ला कुणाचा राजाश्रय आहे, हे न समजण्या इतकी जनता नक्कीच दुध खुळी नाही. याला कुणाचा राजकिय वरदहस्त आहे. हे आता लपुन राहिलेले नाही, पोलिस सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असतो मात्र हा सर्वसामान्यांना अडकिविण्यासाठी प्रयत्नशील असतो, जर रक्षकच झाले कायद्याचे भक्षक तर न्याय मागायचा कोणाकडे...? हाा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे...,!

