shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

त्या १८४ सभासदांना मतदार यादीतून वागळण्यावर अखेर शिक्कामोर्तब..! जिल्हा उप निबंधक यांच्या निर्णयाने सत्ताधारी गटाला धक्का..!

देवळाली प्रवरा - २० एप्रिल
देवळाली प्रवरा सोसायटीचे ते १८४ सभासद मतदार यादीतून वागळण्याचा निर्णय अहमदनगर चे जिल्हा उप निबंधक दिग्विजय आहेर साहेब यांनी दिला आहे. 

      १० गुंठे पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या सभासदांकडून सोसायटीला कोणताही आर्थिक फायदा नसल्याने व या सभासदांचा केवळ निवडणुकीत मतदानासाठी वापर करून घेतला जात असल्याने सोसाटीचे क्रियाशील सभासदांचे मोठे नुकसान होत होते म्हणून डॉ तनपुरे सह साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण ढुस व देवळाली प्रवरा नागरपालिकेचे माजी उपाध्यक्ष कारभारी वाळुंज यांनी दाखल केलेल्या तक्रारी नुसार ज्या सभासदांना १० गुंठे पेक्षा कमी क्षेत्र आहे अशा १८४ सोसायटी सभासदांचे सभासदत्व राहुरीच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी रद्द ठरविले होते. 
      तथापि देवळाली प्रवरा सोसायटी ची अंतिम मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम अहमदनगर चे जिल्हा उप निबंधक यांचे समोर सुरू झालेने प्रारूप मतदार यादीतुन उपरोक्त १८४ सभासद वगळणे कामी तक्रारदारांनी  जिल्हा उप निबंधक साहेब यांचेकडे मुदतीत हरकत घेतली. 

       त्या हरकती नुसार राहुरीचे सहा. निबंधकांनी सहकारी संस्था अधिनियमातील कलम ११ व २५ अ च्या तरतुदीनुसार १८४ सभासदांची नावे कमी करण्याचा दिलेला आदेश कायम ठेवत प्रारूप मतदार यादीतून त्या १८४ सभासदांची नावे कमी करून अंतिम यादी प्रसिद्ध करणेचे  आदेश जिल्हा उप निबंधक दिग्विजय आहेर साहेब यांनी दिले आहेत.    

       जिल्हा उप निबंधकांच्या या निर्णयामुळे  देवळाली प्रवरा सोसायटी वर्तुळात खळबळ उडाली आहे. सभासद कमी होणार नसल्याच्या वल्गना करून आपलीच पाठ थोपटून घेत पेपरबाजी करणा-या मंडळींना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. या निकालाने आपल्या गटाला पुढील निवडणुकीसाठी उमेदवार मिळतात कि नाही या धास्तीने आपलीच समजुत काढत एकमेंकांना धीर देताना ही मंडळी  दिसत आहेत.  या निर्णयाने सोसायटीचे खरे सभासद आनंदी असुन या डमी सभासदांची व त्यांचे तथाकथित नेत्यांची लुडबुड संस्थेच्या कारभारात थांबणार असुन संस्थेचा कारभार येत्या निवडणुकीत सत्तापालट होत योग्य व्यक्तींच्या ताब्यात जाणार असल्याची सभासद वर्तुळात चर्चा आहे.
close