shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रत्नपुरी येथे शांती सुर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.

रत्नपुरी येथे शांती सुर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.
 
विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: दि.१८ एप्रिल २०२२रोजी रत्नपुरी येथे शांती सुर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक, प्रशासकिय, शैक्षणिक,व वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
    यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , झोपडपट्टी सुरक्षा दल संस्थापक अध्यक्ष मा. भगवानराव वैराट , गटविकास अधिकारी मा.विजय कुमार परिट , पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे , साहाय्यक उपनिरीक्षक दिपाली शिंदे मॅडम,  डॉ.प्रा. अरुण कांबळे सर , उपप्राचार्य बाळासाहेब सरवगोड सर, संकलक पुराभिलेख संचालनालय पुणे मा. रविंद्र फडतरे , सौ. 
   पुनम घनशाम निंबाळकर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फाऊंडेशनचे प्रकाश धा॑डोरे, जालिंदर काटे, सचिन सावंत,सागर काटे, तुषार वाघमारे,बाबजी भोसले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
   हर्षवर्धन पाटील  यांनी व भगवानराव वैराट  यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्या बद्दल माहिती सांगितली व सर्व पुरस्कर्ते असलेल्यांना शुभेच्छा दिल्या.
   शेतीमहाम॑डळा तील कामगारांचे घरांचे व विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील व कटीबद्ध आहे असे ही हर्षवर्धन पाटील  म्हणाले.
    संयुक्त जयंती महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शांती सुर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर फाउंडेशनच्या वतीने स्नेहभोजनाचा आस्वाद देण्यात आला . 
close