shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखरचे ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे विशेष पुरस्काराने सन्मानित.

निमसाखरचे ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे  विशेष पुरस्काराने सन्मानित.
 
शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरीच्या वतीने आदर्श ग्रामपंचायत सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्यबद्दल विशेष पुरस्कार.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर गावचे ग्रामपंचायत सदस्य शेखर संतोष पानसरे यांना शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरी यांच्यावतीने सामाजिक कार्याची दखल घेत  दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पानसरे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुनम निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  पोलिस उपनिरीक्षक अतुल खंदारे, साहाय्यक उपनिरीक्षक दिपाली शिंदे,  डॉ.प्रा. अरुण कांबळे , उपप्राचार्य बाळासाहेब सरवगोड, संकलक पुराभिलेख संचालनालय पुणे रविंद्र फडतरे   यांच्या उपस्थितीमध्ये विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.

यावेळी प्रकाश धांडोरे, जालिंदर काटे, सचिन सावंत, सागर काटे, तुषार वाघमारे,बाबजी भोसले व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शेखर पानसरे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यावरती प्रेम करून मला मतदान रुपी आशीर्वाद दिलेल्या सर्वांचा आहे. तसेच माझ्या या यशामध्ये ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून परिश्रम घेतले या सर्वांना हा पुरस्कार मी समर्पित करीत आहे. माझ्या कार्याची दखल घेत मला शांती सूर्य सोशल फाउंडेशन रत्नपुरीने पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
close