shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सव शनिवार व रविवारी होणार.

वडापुरी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रा उत्सव शनिवार व रविवारी होणार.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी या गावात श्री भैरवनाथ यात्रा उत्सव सालाबादाप्रमाणे यावर्षी होणार असून या यात्रा उत्सवामध्ये शनिवारी दिनांक ९ एप्रिल २०२२ रोजी श्री भैरवनाथाचा महाअभिषेक सकाळी ९ वाजता होणार असून सकाळी ११:३० वाजता भैरवनाथ मंदिर येथे निशाण चडवले जाणार आहे. दुपारी १२ नंतर ग्रामस्थांच्यावतीने ग्राम दैवतांना महा नैवेद्य  केला जाणार. सायंकाळी ६ वाजता श्रीं चा छबिना श्रीनाथ मंदिरातून श्री भैरवनाथ मंदिरात मार्गस्थ  व यानंतर दर्शन सोहळ्यास  सुरुवात होईल. रात्री १० नंतर श्री भैरवनाथ मंदिरातून श्रीं चा छबिना गाव प्रदिक्षणा करून रात्री १२ वाजता गुरु व शिष्य यांची भेट श्रीनाथ मंदिरात होऊन येथून पुढे छबिना श्री भैरवनाथ मंदिरात पोहोचणार असून यानंतर फटाके व शोभेच्या दारूची आतषबाजी होणार आहे व लोकनाट्य तमाशा   विठाबाई भाऊ  नारायणगावकर यांचा तमाशा  कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. दिनांक १० एप्रिल २०२० रोजी सकाळी ८:३० ते ११ वाजेपर्यंत हजेरी तमाशाचा कार्यक्रम संपन्न होईल व त्यानंतर हनुमान मंदिर येथे राम नवमीच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल. या ठिकाणी हरिकीर्तन व फुले टाकण्याचा कार्यक्रम संपन्न होईल आणि महाप्रसाद जगदाळे बंधू यांच्या वतीने होणार आहे. यानंतर दुपारी ३ वाजता कुस्त्यांचा कार्यक्रमाची सुरुवात होईल. सायंकाळी ७ वाजता श्री भैरवनाथ मंदिरात  श्रीं चा छबिना श्री नाथ मंदिरात पोहोचून यात्रेची सांगता समारंभ होईल. सदर यात्रा पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ वडापुरी यांच्या वतीने  होणार आहे.
close