आरोग्यम धनसंपदाचा उल्लेखनीय उपक्रम
प्रतिनिधी : सुर्यकांत होनप
अक्कलकोट : दि .७ / तरुणाला ही लाजवेल असं शाश्वत आयुष्य जगणाऱ्या अब्दुलरजाक पकाले यांचे वय १०८ वर्षे असून त्यांना आतापर्यंत ब्लडप्रेशर, शुगर अथवा अन्य कोणताही आजार नाही. अशा निरोगी वयोवृद्ध आजोबाचा सत्कार सफरचंद,फुलांचा हार घालून आरोग्यम धनसंपदा या संस्थेच्या वतीने करण्यात आला .
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतिष बिराजदार हे होते.आपल्या प्रास्ताविकेतून आयोजक स्वामींनाथ हरवाळकर यांनी पकाले यांना बोलतं केलं.
१९१५ साली स्वातंत्र्य पूर्व काळात पकाले यांचा जन्म झाला.मराठी पाचवी पर्यंत शिक्षण झालं.वडील ब्रिटिश काळात पोलीस होते. त्यामुळे घरी सुबत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.महात्मा गांधी,अक्कलकोटचे संस्थानिक विजयसिंह महाराज, बाबा महाराज यांच्या आठवणीना उजाळा दिला.जन्म मुस्लिम समाजातील असला तरी आपण संपूर्ण आयुष्य शाकाहारी असल्याचे त्यांनी सांगितले.अजूनही काठी धरून ते शहरालगत दोन किलोमीटर च्या परिसरात आपली गुरे चारण्यास जातात.
या वेळी शबाना तारानाईक,विनोद ढगे,ग्रेस काकडे,सुरेखा वर्दे,प्रमिला वाघमारे,नागम्मा नंदे,ललिता चिंचोळे आदि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते .

