shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय सचिव पदी काशिनाथ माळी यांची निवड..!

सामोडे  (वार्ताहर):-- ब्राह्मणवेल तालुका साक्री जिल्हा धुळे येथील  काशिनाथ नारायण माळी यांचे सामाजिक स्तरावर काम करण्याची व सामाजिक बांधिलकी बघून अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  .विलासराव पाटील  यांनी  काशिनाथ माळी यांची अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सचिव पदी यशस्वी निवड केली.

काशिनाथ माळी हे सामाजिक स्तरावर विविध अशा संस्थांचे निगडित काम करीत असतात . या अगोदर नाशिक विभागीय उपाध्यक्ष - अ .भा . माळी महासंघ  नाशिक ' जिल्हा संयोजक -समता परिषद नंदुरबार, माजी जिल्हाध्यक्ष - अ .भा . माळी महासंघ नंदुरबार, तसेच माजी स्वीकृत संचालक - धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षकांचे पतसंस्था धुळे . जिल्हा सरचिटणीस - विज्ञान व गणित अध्यापक धुळे ' धुळे जिल्हा शहर कार्यकारिणी सदस्य - ओ .बी . सी . विभाग राष्ट्रवादी कॉंग्रेस 'अश्या अनेक संस्थावर कार्यरत आहेत . तसेच उपशिक्षक म्हणून ब्राम्हणवेल येथे २५ वर्षापासून कार्यरत आहेत .


त्यांना अनेक संस्थाचे आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळालेले आहेत . महात्मा फुले युवा मंच नंदुरबार जिल्हा या संस्थेचा " कोविड योध्दा " या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे . माळी महासंघाच्या ते युवा अध्यक्ष , कार्यकर्ते पासून कार्य करत असतांना त्यांच्या वर अनेक जबाबदारी दिल्यात आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांभाळल्या व न्याय दिला . त्यांच्या या निवडीमुळे सामाजिक क्षेत्रात खुप मदत होणार आहे म्हणून त्यांचे अभिनंदन सर्व स्तरातून करण्यात येत आहे .. त्यांचे अभिनंदन माजी राष्ट्रीयध्यक्ष श्री . बापूसो . संभाजीराव पगारे ' मा बापूसो . डि. के . माळी ' विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष   विलासराव पाटील ब्राम्हणवेल येथील जीवनज्योती फुले एज्यु. सोसा .चे .चेअरमन  तुकाराम महाजन , संस्था सचिव  एकनाथ महाजन ,  पाटील भाऊ माळी ( कृषी भूषण पुरस्कार ) डिगंबर माळी ( शिरपूर ) , सखाराम महाजन ( शिरपूर ) , नारायण महाजन (रामी ), अॅड कुंदन पवार (धुळे ),   महेश मुळे सर ( शिक्षक परिषद ), . संजय पवार ( धुळे) , एस .के . चौधरी,  एस एम पाटील , पी झेड . कुवर . ( जिल्हाध्यक्ष विज्ञान व गणित मंडळ धुळे ), मुख्याध्यापक   गणेश माळी , नरेद्र माळी ( शहराध्यक्ष भाजपा नंदुरबार ), सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मंडळी ब्राम्हणवेल आदींनी कौतुक केले.
close