भिमाई आश्रमशाळेत रक्तदान शिबीराचे आयोजन.
इंदापूरप्रतिनिधी:( दि.९) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे या कार्यालयाच्या दि.७ एप्रिल.२२ च्या पत्रान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक समता कार्यक्रम ह्या उपक्रमातंर्गत भिमाई आश्रमशाळेत मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर संचलित प्राथमिक आश्रमशाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने( दि.९) शनिवारी रोजी रक्तदान शिबिराचे उत्स्फूर्तपणे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड सेंटर अकलूज या ब्लड बँकेला निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे यांनी केले.
रक्तदान हेच जीवनदान. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे समजले जाते. गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये, म्हणून रक्तदानाची शिबिरे घेणे, ही तशी नित्याचीच बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था,
मंडळं व राजकीय पक्ष आदींद्वारे रक्तदान शिबीरं आयोजित केली जातात.भिमाई आश्रमशाळेत आयोजित रक्तदान शिबिरात संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. संस्थेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षकांच्या पाल्यांचा देखील रक्तदान शिबीरात सहभाग होता.
वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. सामान्य जनतेस मदतीचा हात मिळावा या सामाजिक बांधिलकीतून हे रक्तदान शिबीर संस्थेत आयोजित केल्याचे सचिव ॲड. समीर मखरेंनी म्हटले आहे.
यावेळी २५ बाटल्या रक्त संकलन झाले.यावेळी रक्तदात्यांना पाणी,चहा, बिस्किट, केळी देण्यात आले. रक्तदात्यांचे संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांनी मनापासून आभार मानले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरे यांनी रक्तदान शिबीराला आवर्जून भेट देऊन पाहणी केली.ब्लड बँकेच्या टीमचे प्रमुख डॉ. संतोष दोशी, डॉ.अजित गांधी, तुषार साबळे (जनसंपर्क अधिकारी), पल्लवी क्षीरसागर, इंद्रजित कोडलिंगे, राजू दोरकर, हनुमंत खंडागळे, विधुलता काळे, श्रद्धा पाचणकर, (आरोग्य सेविका)
महेश निंबाळकर (स्वामी समर्थ लॅब,इंदापूर)आदींचा गुलाब पुष्प देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. सदर रक्तदान शिबीराचे नियोजन मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांनी केले.

