दिवंगत पतीचा जळत असलेला फोटो पाहून सरस्वतीचे अश्रु अनावर
प्रतिनिधी : आसावरी वायकर
दहिगाव : १३ / नगर शहरा पासुन सोळा किमी अंतरावर नगर सोलापूर रस्त्यावरील नगर तालुक्यातील दहिगाव येथे श्रीरामाचा अखंड हरीनाम सप्ताहाचे शेवटचे काल्याचे किर्तन होते . त्यामुळे शिंदे यांच्या घरातील सर्व सदस्य गावातील देव दर्शनासाठी गेले होते. सकाळी अकराच्या सुमारास घरातुन धुराचे लोट येत असल्याचे शेजारी असलेल्या नागरीकांनी पाहिले असता शिंदे कुटुंबाच्या सदस्यांना मोबाईल द्वारे सदर घटनेची माहिती समजताच सर्व सदस्य घरी पोहचले .
तोपर्यंत घरातील सर्व संसार उपयोगी कपडे, धान्य ,किराणा, लहान मुलांचे औषधे, अंथरुण पांघरुण, लहान मुलांचे खेळणी , खाऊ, फ्रिज, टिव्ही सर्व संसार उपयोग वस्तू जळुन खाक झाल्या होत्या. मागच्या खोलीत जनावरांचे खाद्य वालीस गोण्या धान्य वाचवण्यासाठी विशाल शिंदे, कैलास शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता जळत्या घरात प्रवेश करुन काही धान्य, जनावरांचे खाद्य वाचवण्यात त्यांना यश आले. या आगीत शिंदे कुटुंबाचे जवळपास एक ते दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
विश्वास शिंदे व विशाल शिंदे य यांचे लहानपणी वडीलांचे छत्र हरपले असल्याने त्यांच्या आईने मोठ्या हिमतीने व कष्टाने संसाराचा गाडा पुढे आणला होता. काल लागलेल्या आगीत भिंतीवर लावलेला पतीचा फोटो पेटलेला पाहून सरस्वती शिंदे यांच्या डोळ्यांतुन अश्रू धारा वाहत होत्या . गावातील नागरिकांना हे दृश्य पाहून अश्रू अनावर झाले होते.
घरातील लहान थोराचे अंगावरचे कपडे सोडून इतर काही शिल्लक नव्हते.सर्व या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या स़ंकट समयी गावातील तरुण मदतीला धावून आल्या नंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले . घरात फक्त आणि फक्त जाळ धूर राख शिल्लक दिसत होती. तरी शिंदे कुटुंबीयांना या दुःखातुन सावण्यासाठी आथिर्क मदतीची हात द्यावा.
सामाजिक संघटना तसेच दानशूर व्यक्तींनी शिंदे कुटुंबीयांना वस्तू स्वरूपात अथवा रोख रक्कम मदत म्हणून द्यावी. अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांनी व्यक्त केली आहे.

