प्रतिनिधी : शिवा म्हस्के
दहिगाव : ६ / नगर तालुक्यातील नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे दहिगाव येथे ऐतिहासिक श्रीराम मंदिर देवस्थान आहे. या देवस्थान समोर सिना नदी वाहते आख्यायिका नुसार प्रभु श्रीरामचंद्र वनवासा काळांत याठिकाणी त्यांनी वास्तव्य केले आहे . त्यांनी या नदीत स्नान केल्याने त्यांचा सिनभार गेला तेव्हा पासून या नदीचे नाव सिना नदी असे पडले. नवसाला पावणार श्रीरामाचे तिर्थक्षेत्र या ठिकाणी आहे.
अनेक भावीक श्रीराम नवमी दिवशी आपला नवस नारळ पेढे वाटून फेडत असतात.या यात्रेला जिल्हा भरातुन भावीक भक्त येत असतात. गेले दोन वर्षांपासून कोरोना महामारी संकट असल्याने यात्रा उत्सव भरला नाही. शासनाने सर्व कोरोना निर्बंध हटवल्याने या वर्षी मोठ्या आनंदाने अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. याची सुरवात हिंदू नव वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्रीराम देवस्थान येथे धार्मिक विधीवत पूजा अर्चा करून सप्ताह सुरू होत असतो.
या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राम मंदिर समोर १०० फुटी भगवा ध्वजारोहण ह.भ.प डाॅ.विकासनंदजी मिसाळ महाराजांच्या हस्ते
करण्यात आले.या वेळी गावातील तरुण, मान्यवर भक्त मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.तसेच सकाळी मोठ्या आनंदाने श्री राम लक्ष्मण, सिता, हनुमान, यांच्या मुतीॅस नवीन पोशाख अंलकार पुजा आरती करून श्रीराम सप्ताहास सुरुवात झाली. दि.३ एप्रिल ह.भ.प एकनाथ चत्तर शास्त्री महाराज, दि.४ एप्रिल उध्दव मडलीक महाराज, दि.५ एप्रिल रामदास रक्ताटे महाराज,दि.६ सुनिलजी मंगळापुरकर महाराज, दि.७ एप्रिल गणेशजी घोडके महाराज, दि.८एप्रिल कैलासजी येवले महाराज, दि.९एप्रिल दिगंबर नरवडे महाराज, दि.१० एप्रिल ज्ञानेश्वर कदम महाराज , बबन बहिरवाल महाराज संध्याकाळी ७ ते ९ हरिकिर्तन होत असते. तसेच.दि.११एप्रिल रोजी सकाळी ९ ते ११ वैराग्यमुतीॅ गुरुवर्य ह.भ.प डॉ.नारायण जाधव महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नुकतेच मंदिराचे आकर्षक रंगकाम देखील करण्यात आले आहे. दि.७ एप्रिलला दहिगाव येथुन तरुण कावडी घेवून नाथसागर जल आणण्यासाठी पैठणकडे रवाना होतात. दि.१० एप्रिल सकाळी कावडी आल्यानंतर गावात भव्य मिरवणूक काढली जाते.आणलेल्या जलाने श्रीरामास जलअभिषेक केला जातो. दि.१० एप्रिल मौजे दहिगाव श्री रामनवमी यात्रा उत्सव भरत असतो.
अखंड हरिनाम सप्ताह, कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, काकड भजन हरीनाम जागर तरी सर्व भाविक भक्तांनी या श्रवणाचा लाभ घ्यावा. व आपले जीवन सार्थक करावे अशी नम्रतेची विनंती श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट, विश्वस्त मंडळ, समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आली आहे. या यात्रेच्या ठिकाणी नगर तालुका पोलिसाचा चोख बंदोबस्त असतो.

