हर्षवर्धन पाटील यांची समर्थनार्थ शेकडो युवकांनी घेतली भेट!
- निष्ठेचे प्रतीक म्हणून विठ्ठलाची मूर्ती दिली भेट
- इंदापूर तालुक्यातील शेकडो युवकांची उपस्थिती
फोटो :-इंदापूर येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना तालुक्यातील युवक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन विठ्ठलाची मूर्ती भेट दिली
इंदापूर: प्रतिनिधी दि.3/4/22
इंदापूर येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भाग्यश्री बंगला येथे रविवारी ( दि.3) सकाळी अचानकपणे तालुक्यातील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी भेट घेऊन आपले समर्थन व्यक्त केले. यावेळी युवकांनी हर्षवर्धन पाटील यांना निष्ठेचे प्रतीक म्हणून विठ्ठलाची मूर्ती भेट दिली. यावेळी या युवकांनी तुम्हीच आमच्यासाठी राजकारणातील विठ्ठल आहात, आम्ही तुमची आयुष्यभर साथ सोडणार नाही असे वचन दिले. याप्रसंगी वातावरण काहीसे भावनिक बनले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील शेकडो युवकांनी अचानकपणे येऊन दिलेल्या नि:स्वार्थी समर्थनाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
___________________________
.

