पुणे, मुंबई शहरासह इतर शहरांना लाजवेल असे सर्व सोयींनी युक्त ग्रामीण भागात लाखेवाडी येथे दर्जेदार शैक्षणिक संकुल उभा खा. शरद पवार.
इंदापूर प्रतिनिधी:पुणे, मुंबई शहरासह इतर शहरांना लाजवेल असे सर्व सोयींनी युक्त ग्रामीण भागात लाखेवाडी येथे दर्जेदार शैक्षणिक संकुल उभा केल्याबद्दल शरद पवार यांनी श्रीमंत ढोले,सहकाऱ्यांचे कौतुक केले.इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने लाखेवाडी ( ता. इंदापूर ) येथील जय भवणीगड विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल प्रांगणात शेतकरीमेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे उदघाटन पद्मविभूषण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे ,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार यशवंत माने,आमदार संजय शिंदे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणेजिल्हा ध्यक्ष प्रदीप गारटकर,जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, नवनाथ रुपनवर, श्रीधर बाब्रस व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जय भवानीगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले, दीपक जाधव, बाळासाहेब पाटील, वकील तानाजी देवकर व योगेश देवकर, राणी आढाव, मच्छिंद्र चांदणे,नंदकुमार गायकवाड,प्रवीण बाबर ,सुनिल जगताप, अण्णासाहेब साळुंखे, शिवाजी तरंगे, सोमनाथ जावळे, शैलजा जावळे, रामदास जामदार आदींनी भाजप मधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
यावेळी पुणे, मुंबई शहरासह इतर शहरांना लाजवेल असे सर्व सोयींनी युक्त ग्रामीण भागात लाखेवाडी येथे दर्जेदार शैक्षणिक संकुल उभा केल्याबद्दल शरद पवार यांच्या सह सर्व वक्त्यांनी श्रीमंत ढोले,सहकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या चौफेर कामांची शाबासकी शरद पवार यांच्यासह सर्व वक्त्यांनी दिली.
शरद पवार पुढे म्हणाले, शेतीप्रधान देशात ज्यावेळी मी पहिल्यांदा केंद्रीय कृषी मंत्री झालो, त्यावेळी पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी अमेरिकेतून गहू आयात करण्यासाठी फाईल वर सही करण्याससांगितले.त्यावेळी मी नाईलाजाने त्यावर सही केली. मात्र त्यानंतर काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊनदेशाच्याअन्नधान्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे आपला देश तांदूळ, दूध व फळबाग उत्पादन यामध्ये प्रथम क्रमांकाचा तर गहू उत्पादनात द्वितीय क्रमांकाचा देश बनला त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनातआर्थिक सुबत्ता आली.माझे वडील छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक असतानाउत्पादित उसास २५ रुपये हा भाव दिला होता मात्र आता काही कारखाने उसाला २८०० ते ३००० रुपये भाव देत आहेत मात्र या परिसरातील कारखाना शेतकऱ्यांना २३०० रुपये भाव देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिटन पाचशे रुपयांचे नुकसान होत आहे कारखान्याचा साखर उत्पादनाचा खर्च जाता शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळावेत हे गरजेचे आहेत त्यासाठी आताअनेककारखाने साखरेऐवजी इथेनॉलचे उत्पादन घेत आहेत इंधनामध्ये इथेनॉल एकत्र करून वाहने चालवता येतात त्यामुळे शेतकऱ्यांना देखील जास्त पैसे देता येतील.
इंदापूरतालुक्यातील २२ गावांच्या बारमाही पाणी प्रश्नांचाअभ्यास आम्ही करत असून हा प्रश्न आम्ही निश्चित सोडवून शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाराचा योग्य विनियोग करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून १२६० कोटी, जल जीवन च्या माध्यमातून २४८ कोटी तसेच इतर विविध योजनातून कोट्यावधी रुपयांचा निधी इंदापूर साठी आणला आहे त्यामुळे योग्य सत्ता राबवणाऱ्या दत्तात्रय भरणे यांना जात-पात-धर्म बाजूस ठेवून साथ द्या, प्रवेश करणाऱ्या सर्वांचा योग्य सन्मान ठेवला जाईल अशी ग्वाही शेवटी शरद पवार यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नीरा-भीमा कारखान्याचे तीन हजारसभासद असून त्यातील हजार, बाराशे बाहेरील आहेत.आठ हजार शेतकऱ्यांनीसोसायट्यांची कर्ज काढून शेअर्स खरेदी करण्यासाठी अर्ज केला मात्र त्यांना अद्याप सभासद करण्यात आले नाही. श्रीमंत ढोले यांना सुद्धा सभासद करण्यात आले नाही. तुमचे काय दुखते असा प्रश्न नीराभीमाकारखान्या चे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांनी केला. हा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तसेच संबंधितांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. याउलट छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर, दौंड शुगर कारखान्यात शेअर्सची रक्कम भरल्यास शेतकऱ्यांना लगेचसभासद केले जाते हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. शेजारील कारखान्यात तीन हजार च्या आसपास ऊसाला भाव दिला जात असताना नीरा भीमा कारखाना मात्र २३०० रुपये भाव दिला जातो.शेतकऱ्यांच्या पाचशे रुपयाच्या फरकाप्रमाणे किती नुकसान होत आहे याचे भान ठेवणे गरजेचे आहे.आम्ही आमच्या ताब्यातील कारखान्यांची गाळप क्षमता वाढवली आहे, त्यामुळे इंदापूरच्या शेतकऱ्यांनी ऊस गाळपाची चिंता करू नये . आमच्याकडे येणारी लोक का येतात याचे विरोधकांनी आत्मपरीक्षण करणेगरजेचे आहे.
सूतगिरणी व बायोशुगर कारखाना उभारणीसाठी शेतकऱ्याकडून कवडीमोल किमतीत शेत जमिनी घेण्यात आल्या मात्र कारखानदारी उभा करण्यात आली नाही मात्र त्या जमिनीवर कुसळे उगवली आहेत .त्यामुळे बनवा बनवी केल्यामुळे दत्तामामा भरणे यांनी दोन विधानसभा निवडणुकीत तुम्हाला चितपट केले असा टोला त्यांनी हर्षवर्धन पाटलांना मारला. श्रीमंत ढोले यांनी दिमाखदार कार्यक्रम केल्याबद्दलत्यांनी कौतुक केले.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, होत्याचे नव्हते व नव्हत्याचे होते करण्याची ताकद फक्त देशाचे नेते शरद पवार यांच्या मध्येच आहे. राज्यात ६४ आमदारांचा मुख्यमंत्री, ५४ आमदारांचा उपमुख्यमंत्री व ४४ आमदारांचे मंत्री तर १०५ आमदारांचा विरोधी पक्ष नेता तयार करण्याचे काम फक्त शरद पवारच करू शकतात त्यामुळे त्यांच्या संस्कारात राहिल्या मुळे मला देखील आताअंडीपिल्लीकळायला लागली आहे. त्यामुळे दत्तात्रेय भरणेजिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना मी त्यांना भावी आमदार होणार असा उल्लेख केला होता मात्र ते आता राज्यात मंत्री म्हणून देखील काम करत आहेत. त्यामुळे तुम्ही पवार साहेबांचा नाद करू नका असा उपरोधिक सल्ला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,जगभरातून येणाऱ्या पक्षी अभ्यासकांनारोहीत,चित्रबलाक व इतर पक्षी यांचे निरीक्षण करण्यासाठी इंदापूर तालुक्यात कुंभारगाव, कडबनवाडी व गंगावळण येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र विकसित करण्यात येत आहे मात्रयाचे सर्व काम स्थानिक लोकांना दिले जाणार आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात सर्वत्र कोरोना होता मात्र बारामती, इंदापूर व नांदेड येथे विकासाचा कोरोना होता. तालुक्याचा सर्वांगीणविकास झाला आहे मात्र लाकडी लिंबोडी येथील पाणीपुरवठा योजना तसेच बावीस गावांच्या बारमाही पाण्याचा प्रश्न न सुटल्यास आपण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मत मागायला येणार नाही असे सूतोवाचयावेळी मंत्री भरणे यांनी केला.
जय भवानी गड विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत ढोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या बावीस गावांच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, आम्ही पक्ष प्रवेश केल्यामुळे आमच्यावर खोट्यानाट्या केसेस दाखल केल्या जातील, याचा बंदोबस्त व्हावा तसेच या भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपाची हमी मिळावी यासाठी आम्ही भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
स्वागत उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले यांनी तर सूत्रसंचालन श्वेता हुल्ले व अनिल रुपनवर यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी मानले.

