औरंगाबाद :-महाराष्ट्र राज्य भटके-विमुक्त समाज संघर्ष समितीच्या वतीने बीड बायपास रोडवरील वैदू समाजाच्या वस्तीमध्ये मंगळवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचे वितरण करण्यात येणार आहे.
या वस्तीतील रहिवासी अध्यापही अशिक्षित असून त्यांना अक्षर ओळख तरी व्हावी यासाठी वह्या पुस्तके पेन इ शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. साहित्यिक टि. एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात तहसीलदार आर के.मेंडके यांचा सत्कार प्राचार्य हसन इनामदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी उत्तमराव पळसकर ज्योती गरुड, दुर्गादास गुढे, सुभाष शेळके, विभावरी मोरे, उज्वला जाधव, महादेव डांबरे, अंबादास रगडे, रामभाऊ पेटकर, कडुबा गायकवाड ,किसन पवार,मल्हारी पवार आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील.

