shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझ्या वैद्यकीय वाटचालीत श्रीरामपूरच्या मातीचे आणि माणसांचे अनंत ऋण आहे - डॉ.सचिन पाटील

श्रीरामपूर (प्रतिनिधी): - मी वैद्यकीय क्षेत्रात पुणे येथे जी यशस्वी वाटचाल करीत आहे, त्यामध्ये श्रीरामपूरच्या मातीचे आणि माणसांचे अनंत ऋण आहे असे उदगार पुणे येथील डॉ. सचिन श्रीधर पाटील यांनी काढले. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्व सुविधांनीयुक्त असे क्लिनिक त्यांनी सुरू केले आहे.
         

डॉ.सचिन हे प्राचार्य एस.सी. पाटील व प्राचार्या सौ.मंगल पाटील यांचे सुपुत्र असून  न्यू इंग्लिश स्कूल,उंदीरगाव येथील ग्रामीण भागामध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बोरावके कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले तसेच प्रवरा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी एम.बी.बी.एस.पदवी पूर्ण केली.श्रीरामपूरमधील जर्मन हॉस्पीटलमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्यावर श्रीरामपूरचे पूर्ण संस्कार असून यशाकडे उत्तुंग भरारी त्यांनी मारली आहे. चिंचवड येथे गणेशनगर भागात निओ डायग्नॉस्टिक सेंटर  हे क्लिनिक अद्ययावत सुविधांसह सुरू केले आहे.अशी माहिती प्राचार्य सौ.मंगल पाटील यांनी दिली तर डॉ.सचिन पाटील म्हणाले "श्रीरामपूरच्या मातीत माझी संपूर्ण जडणघडण झाली व मी यशापर्यंत पोहोचलो. श्रीरामपूरचे ऋण मी कधीही विसरणार नाही." अशा शब्दांत याप्रसंगी त्यांनी भावपूर्ण उदगार काढले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी संदर्भात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

 एक्स-रे,सोनोग्राफी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांची पत्नी डॉ. साै.अनुराधा याही औंधमध्ये नामवंत स्किन स्पेशालिस्ट आहेत. त्यांची एक बहीण सौ. स्वप्ना व भाऊ नितीन पाटील हे सर्वच श्रीरामपूरमध्ये शिकले आहेत. एक्स-रे,सोनोग्राफी इत्यादी सुविधांचा शहरी,ग्रामीण  नागरिकांना नक्कीच उपयोग होणार आहे असे डॉ. सौ. अनुराधा पाटील यांनी सांगितले. या आधुनिक वैद्यकीय सुविधा प्राप्त करून दिल्याबद्दल अनेकांनी पाटील परिवाराचे अभिनंदन केले.
close