पुर्णा(प्रतिनिधी ):- पुर्णा शहरातील अॕड.सय्यद एजाज यांच्या 6वर्षाच्या चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्याचे औचीत साधून दिनाक 09/04/2022 शनिवार रोजी आपल्या अयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
रमजान महिन्यात रोजाला मुस्लीम बांधवा मध्ये अनन्य साधारण महत्व असून या महिन्यात मुस्लीम बांधाव सलग्न 30 दिवस रोजा विविध धार्मिक विधी द्वारे अल्हाची पूर्ण श्रध्देने आराधना करतात.या महिन्यात चिमुकले हि आपल्या जीवनातील रोजाची सुरवात करताना याचीच प्रचीती म्हणून 6 वर्षाचा मुलगा मुजम्मील या चिमुकल्याने तप्त्या उन्हाची पर्वा न करता,आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वी केला आहे.,

