shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामोडे येथील कन्या विद्यालय येथे शिक्षण महर्षी स्वर्गीय दादासाहेब श्री दयाराम काशीराम शिंदे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न...!

धुळे । प्रतिनिधी दिलीप घरटे:-  साक्री तालुक्यातील सामोडे येथील प्रतिष्ठित व्यक्ती शिक्षण महर्षी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, सामोडे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय दादासो श्री दयाराम काशीराम शिंदे यांचेदि.८/४/२०२१ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 

दादासाहेबांनी शिक्षण क्षेत्राबरोबरच समाज व गाव व हिताची अनेक उपक्रम व प्रकल्प राबविले शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी दादा नेहमी अग्रेसर असत. म्हणूनच गावात व पंचक्रोशीत दादा यांचे नाव आदराने घेतले जात आज दि.८/४/२०२२ वार शुक्रवार रोजी दादांचा प्रथम पुण्यस्मरण या कार्यक्रमाचे आयोजन  कन्या विद्यालय सामोडे येथे करण्यात आले होते.

 कार्यक्रमाप्रसंगी आप्पासो श्री विनायक देवरे हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आप्पासो श्री. गोविंद वारू एखंडे,  प्रा. श्री. पी.डी कोतकर, (शिव व्याख्याते ) आप्पासो पुंडलीक भदाणे नानासो श्री. विश्वास शिंदे,   निवृत्त मुख्याध्यापक  आबासो.श्री. संभाजी शिंदे, नानासो वसंतराव शिंदे भाऊसो श्री. शरद शिंदे, श्री रावसाहेब प्रकाश शिंदे जी.एन.भदाणे,श्री. एन.एन.शिंदे, श्री काकासो अनिल शिंदे दाजभाऊसो. श्री हंसराज शिंदे,   विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषाताई शिंदे, साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. कविता भदाने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, सौ.जे.डी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळनेर च्या मुख्याध्यापिका, जयदया सार्वजनिक वाचनालय, सुरेखा बाई आदिवासी छात्रालय, संस्था संचलित सर्व विद्याशाखा व त्याची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व ग्रामस्थ आदी. कार्यक्रमास उपस्थित होते..

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. देसाई सर यांनी केले. त्याचबरोबर उपशिक्षक श्री. व्ही.जी.एखंडे सर उपशिक्षिका श्रीमती मनीषा भदाने, उपशिक्षक श्री ज्ञानेश्वर घरटे, श्री. कुणाल बेनुस्कर, श्रीमती कविता एखंडे यांनी आपल्या भाषणातून दादासाहेबांच्या जीवन चरित्र ची माहिती, त्यांच्या विचारांची ओळख आणि त्यांच्या सानिध्यात अनुभवलेल्या विविध प्रेरणादायी प्रसंगांची आठवण सर्व उपस्थितांना करून दिली.

त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रशांत कोतकर शिवव्याख्याते यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला व कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माननीय दादा साहेबांचे मित्र आप्पासाहेब श्री विनायक देवरे यांनी दादासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांची ओळख त्यांच्या आठवणी सर्वांसमोर मांडले अखेर कार्यक्रमाची सांगता माननीय श्री एन.एन. शिंदे सर यांनी आभार प्रदर्शनाने केली.
close