shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांचेशी वीज भारनियमन व विविध विषयांवर चर्चा.

हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांचेशी वीज भारनियमन व विविध विषयांवर चर्चा.
 
इंदापूर : प्रतिनिधी दि.26/4/22
          राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत सोमवारी (दि.25) रात्री शासकीय निवासस्थानी भेट घेऊन राज्यात सध्या सुरु असलेल्या वीजेच्या भारनियमन प्रश्‍नी भाजपकडून शासनावर दबाव वाढविणे, यासह विविध विषयांवरती सुमारे पाऊण तास सविस्तर चर्चा केली.
       राज्य सरकारने विधिमंडळात 3 महिने वीज तोडणार नाही असे जाहीर केले, मात्र दुसर्‍या बाजूला वीज भारनियमन लागू करून शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रास देण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून सध्या सुरू आहे, वीज भारनियमनामुळे ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. राज्यातील विरोधी पक्ष नेता म्हणून मी यासंदर्भात राज्य सरकारला जाब विचारणार आहे तसेच भाजपच्या संघटना पातळीवरही भारनियमनाच्या विरोधात राज्यभर आवाज उठविला जाईल, असे याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच या भेटीत पक्ष संघटना बळकट करणे, साखर उद्योगातील केंद्र सरकारशी संबंधित विषय, आगामी निवडणुका, राजकीय सद्य:स्थिती आदी अनेक विषयांवरती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये सविस्तरपणे चर्चा झाली.

close