shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेऊन केली आगामी काळातील निवडणुका संदर्भात चर्चा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हर्षवर्धन पाटील यांनी  भेट घेऊन केली आगामी काळातील निवडणुका संदर्भात चर्चा.
इंदापूर प्रतिनिधी:  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबलेल्या  आहेत. तसेच ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात अजूनही काही निश्चित झालेले दिसत नाही अशा स्थितीमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन आगामी होऊ घातलेल्या निवडणुका या संदर्भात चर्चा झालेले वृत्त दिसून येत आहे.
देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि झालेल्या चर्चा संदर्भात इंदापूर तालुक्यामध्ये  जनमाणसात होत आहे चर्चेचा विषय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्यामध्ये असलेले सलोख्याचे संबंध तसेच १९ वर्ष मंत्रिपदाची असलेला अनुभव याचा विचार करिता हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने पाठबळ देतील याबाबत  चर्चा होत आहे.
हर्षवर्धन पाटील यांना लवकरच संधी मिळेल अशी चर्चा काही दिवसांपासून होत आहे. या संधी बाबत भारतीय जनता पार्टी कोणती भूमिका घेते याबाबतही जनमानसामध्ये  आजच्या या भेटीमुळे चर्चा होत आहे. हर्षवर्धन पाटील यांना केंद्र सरकार मध्ये संधी देतील की महाराष्ट्र मध्ये संघटन वाढीसाठी त्यांना जबाबदारी देतील अशी ही चर्चा आहे. आगामी निवडणुका यामध्ये कोणती व्युव रचना करता येईल का याची चाचपणी  चर्चेतून झाली असेल .
close