shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी किरण गोफने यांची नियुक्ती.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी किरण गोफने यांची  नियुक्ती.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून इंदापूर तालुक्यातील किरण गोफने यांची पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांनी त्यांची निवड दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी पत्र देऊन केली. असून  त्यांनी या पत्राद्वारे म्हटले आहे की,
राष्ट्रीय समाज पक्ष मध्ये काम करण्याची आपली तीव्र इच्छाशक्ती पाहता आम्हाला अभिमान वाटतो म्हणून जिल्हा अध्यक्ष पुणे ग्रामीण पदी नियुक्ती करत आहे .सदर नियुक्तीचा कार्यकाळ पक्षाच्या ध्येय धोरणाद्वारे पक्षातील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबून असून आपली निवड ही पक्षाच्या घटनेनुसार एक वर्षासाठी करण्यात आली आहे. आपण या पदावर पक्षात कार्यरत असताना पक्षाचे सर्व नियम व अटी शी बांधील आहात. आपल्या निवडीने पक्ष आणि राष्ट्रनायक महादेवजी जानकर  राष्ट्रीय अध्यक्ष व  एस एल अक्कीसागर  व पक्षाची विचारसरणी सर्व समाजातील सामान्य पासून उच्च पदापर्यंत पोहोचले व पक्षाचे कार्य जोमाने वाढेल असा विश्वास आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील रासपा च्या सर्व कार्यकर्ते बंधू-भगिनी मध्ये पक्षाचा आदर व शिस्त आबादित ठेवालअशी अपेक्षा आहे. येणाऱ्या निवडणुकी मध्ये आपल्या कार्यक्षेत्रात रासप  यशस्वी करून आपण आपली निवड सार्थ ठरवाल. भावी काळातील आपल्या कार्यकाल पक्षाला फलदायी ठरेल यासाठी रासपच्या हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे पत्र देऊन किरण गोफने यांची  नियुक्ती केली आहे.
close