शिंदावणे गाव :- संत यादव बाबा महाविद्यालय शिंदवणे वळती संस्थापक.कै . जनार्दन बाप्पू एकनाथ महाडिक यांचे चिरंजीव कैलासवासी दीनानाथ जनार्धन महाडिक यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने वड ,पिपंळ,चिंच, करंज, कडुनिंब, अशा जंगली वृक्षांची लागवड संत यादव बाबा महाविद्यालयात करण्यात आले.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी, कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी." संतानी किती आत्मीयतेने निसर्गाबद्दल, वृक्षांबद्दल लिहिले आहे. बहरलेला निसर्ग कोणाला आवडत नाही? पानांची सळसळ, पक्षांचे मधुर गीत, झऱ्यांची खळखळ, धबधब्याचा घन गंभीर नाद, समुद्राच्या लाटांची गाज, निसर्गाचे हे रम्य रूप आपले सगळे दु:ख विसरायला लावते. . म्हणूनच आपण सर्वांनी झाडे लावली पाहिजेत. नव्हे नव्हे तर ती जगवली पाहिजेत. सृष्टीच्या या चक्रामध्ये प्राणी आणि वनस्पती यांचे अतूट नाते आहे. दोघं एकमेकांवर अवलंबून आहेत. प्राणी श्वास घेताना ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साइड सोडतात तर झाडे कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. अशा तऱ्हेने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राहते आणि सर्व जीव सुखाने राहतात. कारण आता परिस्थिती बदलली आहे. पृथ्वीचा समतोल बिघडला आहे असे प्रतिपादन गणेश महाडिक यांनी केले.
या वेळी सरपंच गणेश महाडिक, उपसरपंच सारिका महाडिक, उषा जनार्धन महाडिक .देगाव चे सरपंच विद्याताई यादव, शिंदवणे गाव चे मा.सरपंच आण्णा महाडिक, सागर अण्णा काळभोर, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, उपस्थित होते .तसेच शिंदवणे गाव चे ग्रामस्थ उपस्थित होते.

