महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त जाधववस्ती शाळेला एक स्पीकर सेट भेट देऊन मुलांना केले खाऊ वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: बारामती तालुक्यातील दिनांक ११ एप्रिल २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववस्ती गोजुबावी (ता.बारामती) याठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९५ वि जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीसुर्य प्रतिष्ठान व संत सावतामाळी तरुण मंडळ जाधववस्ती यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विकास सेवा सोसायटी निर्वाचित चेअरमन सोनल बाजार आटोळे, विकास आटोळे, पांडुरंग जाधव . ग्रामपंचायत सदस्य किशोर जाधव, हिराबाई जाधव, मनिषाताई जाधव व सर्व शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते. तुषार लालासो गटकळ यांच्याकडून शाळेला एक स्पीकर सेट भेट देण्यात आला. शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमानिमित्त मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .
शाळेच्या वतीने लोंढे मॅडम व जाधव मॅडम यांच्याकडून सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

