shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माटुंगा-दादर दरम्यान रेल्वे ची समोरासमोर टक्कर.. पुद्दुचेरी खड्ग एक्सप्रेस ...!पुद्दु्चेरी एक्सप्रेसचे तीन डब्बे रुळावरून घसरले..!

मुंबई: या घटनेत आतापर्यंत यामध्ये कोणतीही जीवितहानी (No causalities) झालेली नाही. त्याचप्रमाणे कुणालाही दुखापत झाल्याचं वृत्त हाती आलेलं नाही. नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली. गाडी नंबर 11005 असा या गाडीचा नंबर आहे. दरम्यान, सुरुवातीला दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या इंजिनची टक्कर झाली. त्यानंतर हादरे बसल्यामुळे दोन्ही गाड्या जागच्या जागी थांबल्या होत्या. या घटनेनंतर मध्यरेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दादर माटुंगा स्थानकादरम्यान, हा सगळा प्रकार घडला. मध्य रेल्वेच्या दादर मार्गावर झालेल्या या घटनेमुळे आता दादर पॉन्डिचेरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय.


या गाडीतील प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून स्टेशन गाठण्यासाठी धावपळ केली. सुरुवातीला नेमकं काय झालंय, हे देखील प्रवाशांना कळायला काही मार्ग नव्हता. या संपूर्ण प्रकाराबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून आता नेमकी काय माहिती दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

close