नगर । प्रतिनिधी :
विश्वरत्न, भारतरत्न, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंतीसाठी 14 एप्रिल 2022 रोजी शिंगवे नाईक येथे जयंतीच्या कार्यक्रमासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे, पांढरकर सर, शिंदे सर यांची विशेष उपस्थिती होती.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून उपस्थित सर्व भीमसैनिकांना आठरे साहेबांनी शुभेच्छा दिल्या.भविष्यकाळात युवा वर्गाने खूप शिका आणि खूप खूप मोठे व्हा असे आव्हाहनही उपस्थित तरुण वर्गाला केले.
या कार्यक्रमानिमित्त रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जयंतीला गावातील विश्वासराव जाधव,प्रदीप नाईक, एकनाथ जाधव,सुनील जाधव, संतोष कोराळे,जावेद सय्यद,हरीश शेळके,भीम सैनिक,ग्रामस्थ व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..हा कार्यक्रम चांगला संपन्न होण्यासाठी बाबासाहेब संघर्ष समिती शिंगवे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र साळवे सर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार बापूजी साळवे यांनी मानले.

