श्रीरामपूर : -वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसद संघ ( वर्ल्ड पार्लमेंट ) यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड -२०२२ '' ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी कला, क्रिडा, साहित्य, सांस्कृतीक, पर्यावरण, रक्षा -सुरक्षा, वैद्यकीय, औद्योगिक, तंत्रज्ञान, गिर्यारोहण, संगीत, गायन, वादन, चित्रकारीता, पत्रकारीता, उद्योग, समाजसेवा व इतर सर्वच प्रकारच्या क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणारे स्त्री व पुरुष आपला प्रस्ताव पाठवू शकतात.
सन २०१९ पासून सुरू झालेल्या या मानाच्या पुरस्काराचे मानकरी प्रशासकीय व पोलिस सेवेतील अधिकांऱ्यासह अनेक मान्यवर ठरले असून प्रत्येकाला हा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी आशा आहे. मागील दोन वर्ष कोरोना संसर्गामुळे सहभाग घेऊ न शकलेल्या इच्छुकांच्या खास मागणीवरून या वर्षी प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली आहे.
वर्ल्ड पार्लमेंट हि जागतिक पातळीवर सामाजिक, पर्यावरण व कायदेविषयक कार्य करणारी संस्था असून जवळ जवळ दोनशे देशात संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेचे मुख्यालय अमेरिकेत कोलोरॅडो येथे असून अमेरिकेचे प्रा.डॉ. ग्लेन मार्टिन हे विद्यमान अध्यक्ष आहेत. सन २०१९ साली झालेल्या पहिल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास श्रीरामपूर येथे वर्ल्ड पार्लमेंटचे अध्यक्ष डॉ. ग्लेन मार्टिन सपत्नीक हजर होते.
सदर पुरस्कार विजेत्यांना सन्मानपत्र, मानचिन्ह व संस्थेचे आजीव सदस्यत्व देण्यात येते. तरी इच्छुकांनी आपल्या कार्याचा तपशील असलेला प्रस्ताव wcpashrirampur@gmail.com या मेल आयडीवर मेलद्वारे पाठवायचा असून सोबत आपला नवीन पासपोर्ट फोटो पाठवायचा आहे. तसेच प्रस्ताव पाठविणाऱ्यांनी [ ९०९६३७२०८२ ] या मोबाईल क्रमांकावर संपर्क करणे गरजेचे असेल.
अशी माहिती डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टर प्रेसिडेंट डॉ. दत्ता विघावे यांनी दिली आहे.

