shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तरूणीवर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी ; नगर तालुका पोलिसांत देवळाली प्रवराच्या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 सोमवार दिनांक १८ एप्रिल २०२२

 
तरूणीवर अत्याचार करत फोटो व्हायरल करण्याची धमकी ; नगर तालुका पोलिसांत देवळाली प्रवराच्या तरूणाविरूध्द गुन्हा दाखल..!!

अहमदनगर : तरूणीवर अत्याचार करत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी करणार्‍या तरूणाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचार, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप आण्णासाहेब पंडीत (रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. नगर तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या तरूणीने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
23 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 12 ते तीन वाजेच्या दरम्यान अहमदनगर- कल्याण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी काल रविवारी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी तरूणी व प्रदीप पंडीत हे दोघे नागापूर एमआयडीसीत कंपनीमध्ये कामाला होते. त्यांच्यामध्ये ओळख होती. 23 जानेवारी, 2022 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास प्रदीपने फिर्यादी तरूणीला फोन करून अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौकात बोलून घेतले. मैत्रिणीकडे चालले असे घरी सांगून फिर्यादी तरूणी स्टेट बँक चौकात गेली. तरूणी तेथे जाताच प्रदीपने तिला गाडीवर बसून अहमदनगर-कल्याण महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे प्रदीपने एका रूममध्ये फिर्यादी तरूणीवर बळजबरीने अतिप्रसंग केला.

घडलेल्या घटनेनंतर 15 दिवसांनी प्रदीपने कंपनीचे काम सोडले व तो गावी देवळाली प्रवरा येथे गेला. त्यानंतर त्याने फिर्यादी तरूणीला फोन करून,‘खात्यावर पैसे टाक, नाहीतर मी तुझी बदनामी करेल’, असे म्हणून पैशाची मागणी केली. फिर्यादी तरूणीने प्रदीपला पाच ते सहा वेळेस कधी 500 ते कधी एक हजार रूपये असे पैसे पाठविले. यानंतर पैसे पाठविणे बंद केल्याने प्रदीपने फिर्यादी तरूणीचे फोटो व्हॉट्सअपद्वारे स्टेटसला व्हायरल करतो, अशी धमकी देवुन खंडणी मागितली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close