शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १८ एप्रिल २०२२
नेवासा तालुका टँकरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार - ना. गडाख..!!
नेवासा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली करोना काळात देखील नेवासा तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी आपण तालुक्यासाठी आणला. त्यांच्याच नेतृत्वाखाली नेवासा तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार असून पुढील काळातही तालुक्यातील पाणी योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध करून संपूर्ण नेवासा तालुका टँकरमुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील विविध गावांतील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी जलसंधारण मंत्री गडाख यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचेकडे पाठपुरावा करत तालुक्यातील वडुले, नांदूर शिकारी, सुकळी बुद्रुक व खुर्द, पाथरवाला, सुलतानपूर या गावांच्या पाणी योजनेसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत 30 कोटी रुपयांच्या योजनेस मंजुरी मिळवली.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वडुले येथे पाचही लाभार्थी गावातील ग्रामस्थांच्यावतीने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शनिवाी नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. डोक्यावरील पाण्याचे हांडे कायमस्वरूपी उतरणार असल्याने कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. उपस्थित महिलांनी मंत्री गडाखांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले.
यावेळी सरपंच दिनकर गर्जे, अशोक गर्जे, अरुण आतकरे, वल्लभ गर्जे, नांदूर शिकारीच्या सरपंच केशरबाई सरोदे, संतोष लिपने, हरिभाऊ शिरसाठ, विलास लिपने, गोरक्षनाथ राजमाने, सरपंच शशिकला पवार, उपसरपंच बाळासाहेब म्हसरुप, गोरक्षनाथ साबळे, खंडेराव गुंड, भाऊसाहेब साबळे, सरपंच संगीता थोरे, हरिभाऊ थोरे, दत्तात्रय खाटीक, सरपंच अनिता शिंदे, भगवान पाटील, दिलीप कोठुळे, सोपान कोठुळे, शुभम देशमुख यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणीप्रश्न मिटणारी गावे व लोकसंख्या
वडुले (1614), पाथरवाला (3187), सुलतानपूर (1822), नांदूर शिकारी (1534), सुकळी बुद्रूक (1186) व सुकळी खुर्द (499) या सर्व सहा गावांची एकूण लोकसंख्या 9 हजार 843 आहे. या पाणी योजनेसाठी वरील सर्व गावांची सन 2053 ची पुढील लोकसंख्या 16 हजार ग्रहीत धरून पाणी योजना साकारणार आहे.
मंत्री शंकरराव गडाख यांच्यामुळे वर्षानुवर्षे पाण्यासाठी आमच्या डोक्यावर असणारे हंडे आता उतरणार असल्याने अतिशय आनंद व समाधान होत आहे. नळपाणीपुरवठा होणार असल्याने गेल्या अनेक वर्षांची मागणी मंत्री गडाख यांच्या प्रयत्नातून साकारत आहे.
- केशरबाई सरोदे सरपंच, नांदूर शिकारी ता. नेवासा.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

