shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी नगर दौर्‍यावर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 सोमवार दिनांक १८ एप्रिल २०२२

खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी नगर दौर्‍यावर..!!

अहमदनगर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी अहमदनगर दौर्‍यावर येणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 8 वाजता येणार असुन आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयामध्ये साडेनऊ वाजता चार्टर अकाउंटंन संघटनेची बैठक घेणार आहेत.
त्यानंतर साडेदहाच्या सुमारास रयत शिक्षण संस्थेच्या जिल्हा कार्यालयात चव्हाण सेंटर व यशस्विनी अभियान बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास आदेश चंगेडिया यांच्या घरी राखीव, दुपारी पावणे दोनच्या सुमारास हातमपूर येथील वास्तु संग्रहालयास भेट देणार आहे.

नंतर अडीचच्या सुमारास राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शहर पदाधिकार्‍यांचा संवाद, साडेतीनच्या सुमारास ग्रामीण पदाधिकार्‍यांचा संवाद तर पाचच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close