राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १६-४-२०२२
महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती च्या निमित्ताने राहुरी येथे छ शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती चे आयोजन करण्यात आले होते समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानि निवृत्त मुख्याध्यापक सुयवशी हे होते छ शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतिमे ला मान्य वरा च्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी समिती उप अध्यक्ष संतोष तनपुरे राजेंद्र वाडेकर विदयाताई करपे मधुकर साळवे आदी नी आपले मनोगत व्यक्त केले आभार समिती चे अध्यक्ष अप्पासाहेब मकासरे यांनी मांडले.कार्यक्रम नतर वसतिगृहातील मुलांना स्नेहभोजन देण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद खंडागळे महेश बोर्ड विकास डमाळे गणेश नारद महेश साळवे ओटी सर आदी ने प्रयत्न केले.

