शिंगवे नाईक (वार्ताहर):-
तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर शिंगवे विविध कार्यकारी सेवा सोसायटी मर्यादित शिंगवे तालुका नगर वरती स्वाभिमानी विकास मंडळाला मतदारांनी प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
स्वाभिमानी मंडळाचे तब्बल 12 उमेदवार मतदारांनी प्रचंड बहुमताने निवडून दिले आहेत... त्यांच्यासमोर भैरवनाथ विकास मंडळाचे 12 उमेदवार रिंगणात होते.. विशेष बाब म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच भैरवनाथ विकास मंडळाचे सोन्याबापु बोरुडे हे एकच उमेदवार बिनविरोध झालेले आहे.आणि उर्वरित सर्व बारा विजयी उमेदवार हे स्वाभिमानी विकास मंडळाचे आहेत.परंतु या पंचवार्षिक निवडणुकीत मतदार बंधु यांनी स्वाभिमानी विकास मंडळाला पसंती दर्शविली आहे....स्वाभिमानी विकास मंडळाला एक हाती सत्ता या ठिकाणी मतदारांनी उपलब्ध करून दिली आहे.
पंचेचाळीस वर्षानंतर हा एक मोठा ऐतिहासिक विजयाने शिंगवे सोसायटीवर मोठा बदल व परिवर्तन घडून आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.या बदलामुळे व परिवर्तनामुळे स्वाभिमानी शेतकरी विकास मंडळाचे सर्व विजयी उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

