shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिवरे बाजार येथील मा.पोपट रावजी पवार देशात लयभारी..!!

हिवरे बाजार येथील मा.पोपट रावजी पवार..;
नावलौकीक झाले देशभर...!
लावली झाडे वाढवली झाडे डोंगर रानावर..;
पाणी आडवा पाणी जिरवा ओढया नाल्यावर..!!

श्री.पोपटराव पवार आणि हभप सखाराम महाराज जेठे


हि सर्व कामे जिकरीची होती फार..;
प्रयत्न चिकाटी अतिश्रम हेच त्याला उपचार..!
कर्तबगारीच्या जोरावर पोहचले यशाच्या शिखरावर..;
आधि कष्ट मग फळ अनुभवाचे उत्तर..!!

पोपटरावजी पवार साहेबांचा पारदर्शक कारभार..;
त्यामुळे भक्कम मिळाला महाराष्ट्र सरकारचा आधार..!
शिक्षण क्षेत्रात असा
शोभा ताई पवार..;
पोपटरावजी पवारांना पत्नी लाभली हुशार..!!


मणीप्रमाणे दुधात पडली साखर..;
पती पत्नीचा झाला एक विचार..!गाव नेऊ प्रगती पथावर...;
ग्रामस्थांचा घेतला मोठा आधार..!!

निर्मिले आदर्श गाव हिवरे बाजार..;
आई बाबांच्या कृपेच्या बळावर..!
पोपटारावजी पवारांची विचार सुखर..;
आणि शोभा ताईना आई बाबांचे लाभले संस्कार..!!

पतीच्या साथीला आहे बरोबर..;
देशभक्तीच्या जोरावर...!
पोपट रावजींच्या पाठीमागे उभा परमेश्वर..;
म्हणून लाभले भारताचे पदमश्री पुरस्कार..!!

पवार साहेबांसारखे देशाचे सरपंच बांधवांनी विकास कामावर दयावे जोर..;
आदर्श नवभारत करावे निर्माण,महात्मा गांधीचे स्वप्न होईल साकार..!
पवार साहेब म्हणतात सर्व सुकाचे आगार..;
आदर्श गाव हिवरे बाजार..!!

एकीची शक्ती थोर; संगठीत राहून भारत भूमीला बनवा अग्रेसर...!!

कवी वर्य व प्रभोधनकार - 
ह. भ.प सखाराम सीताराम जेठे
वय - ८५ वर्षे
दिनांक - १६/११/२०२१
ह.मु.देहरे ता, नगर जि- अ.नगर
मो.नं. -९५२९४३०५९७
close