shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रांझणीच्या ओंकारनाथ देवस्थानमुळे समाजावर चांगले धार्मिक संस्कार- हर्षवर्धन पाटील

रांझणीच्या ओंकारनाथ देवस्थानमुळे समाजावर चांगले धार्मिक संस्कार- हर्षवर्धन पाटील 
 -भोजन कक्षासाठी रु.५ लाखाची देणगी 
फोटो :- रांझणी येथे श्री ओंकारनाथ महाराज मंदिरात हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते शनिवारी ( दि.30) धार्मिक विधी  संपन्न झाले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाविकांना मार्गदर्शन केले.

इंदापूर : प्रतिनिधी दि.30/4/22
    इंदापूर व माढा तालुक्याच्या सीमेवर भीमा नदी काठी रांझणी ( ता. माढा ) येथील श्री क्षेत्र ओंकारनाथ भगवान देवस्थानमुळे समाजावरती तसेच नव्या पिढीवर चांगले धार्मिक संस्कार होत आहेत. ओंकारनाथ महाराजांचे भक्तगण हे विदर्भ, मराठवाडा व संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, असे गौरवोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
      श्री क्षेत्र रांझणी येथे श्री ओंकारनाथ महाराज मंदिरात शनि अमावस्या निमित्त शनिवारी ( दि.30) हर्षवर्धन पाटील व सौ.भाग्यश्री पाटील या उभयतांच्या हस्ते मंदिरामध्ये महाभिषेक व धार्मिक विधी उत्साही वातावरणात पार पडले. तसेच यावेळी आरती हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत उभयतांच्या शुभहस्ते  संपन्न झाली. याप्रसंगी ओंकारनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने हर्षवर्धन पाटील व सौं.भाग्यश्री पाटील यांचा ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासो यादव व उपाध्यक्ष वासुदेव बागल यांनी सत्कार केला. सदर प्रसंगी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
  ओंकारनाथ महाराजांचे विचार मानवजातीसाठी प्रेरणादायी असे आहेत. महाराजांचे आशीर्वाद आपले सर्वांचे पाठीशी कायम राहिले आहेत, हे जागृत देवस्थान आहे. आगामी काळात राज्यात व देशावर कोरोनाचे संकट पुन्हा येऊ नये अशी ओंकारनाथ चरणी प्रार्थना केली आहे. मंदिर परिसरात  चालू असलेल्या भोजन कक्ष बांधकामासाठी रु. 5 लाखाची देणगी यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केली व सदरची देणगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षांकडे सुपूर्दही केली. समाजाला धार्मिक अधिष्ठान देण्याचे चांगले काम देवस्थान करीत आहे, असे गौरवोद्गार यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी काढले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी सरपंच विलास जाधव, नारायण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांचे वतीने भक्त गणांसाठी महाप्रसादाच्या पंगती झाल्या.

 *चौकट :-
 हर्षवर्धन पाटील यांचेकडून शनी दर्शन!
------------------------------------------
 भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शिराळा (टें.) येथील प्रसिद्ध श्री शनिदेवाचे शनिवारी ( दि.30) शनि अमावस्या निमित्त विधिवत पूजा करून मनोभावे दर्शन घेतले.


close