shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बांडेवाडी शाळेत पहिलीत १५ मुले दाखल.

बांडेवाडी शाळेत पहिलीत १५ मुले दाखल.

 इंदापूर प्रतिनिधी:दि ३० जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे शाळा पुर्व तयारी मेळावा , प्रवेशोत्सव , इ ४ थी निरोप व स्नेह भोजन समारंभ संपन्न झाला. सुरूवातीस इ १ लीत दाखल होणारी १५ मुलांची फेटे बांधून , सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी मुलांची भाषा , गणितीय ,शाररिक , बौद्धिक चाचणी घेण्यात आली. पहिलीत प्रवेश घेतलेल्या मुलाचे शैक्षणिक साहित्य देवून स्वागत करण्यात आले , इ चौथीतून पाचवीत जाणाऱ्या मुलांना भेट देवून निरोप देण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र बांडे , शाळा समिती अध्यक्ष दिपक बांडे , सदस्य भाऊसाहेब कदम , राजू मुलाणी ,  अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , उर्मिला बांडे , पालक , महिला , विद्यार्थी , शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संतोष हेगडे यांनी केले. आभार उपशिक्षिका ललिता वाघमोडे यांनी मानले.
close