shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुरुकुल कराटे क्लास मध्ये बेल्ट वितरण सोहळा संपन्न

  प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : ३० / कराटे असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने २३ जानेवारी २०२२ रोजी  झालेल्या बेल्ट परीक्षेचे रीझल्ट  जाहीर झाले.
या ठिकाणी गुरुकूल कराटे क्लास पाईपलाईन रोड येथील अनेक विदयार्थ्यांनी बेल्ट परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला होता . त्यात त्यांना यश प्राप्त झाले. या विदयार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बेल्ट प्राप्त झाले. 

गुरुकूल कराटे क्लास च्या कोच सौ. मंदा खंडारे व ब्लॅक बेल्ट प्राप्त असणारी वैष्णवी खंडारे  यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट वितरण करण्यात आले. यामध्ये तनुजा गुंजाळ हिला रेड बेल्ट, तेजस्विनी हिरडे हिला ब्लू वन बेल्ट, रिहाश दहातोंडे याला ग्रीन वन बेल्ट तसेच स्वरांजली वारे, निरजा घुले, समर बोराटे, प्रियंका लोळगे, सोहम लोळगे यांना ग्रीन बेल्ट गायकवाड, तेजस दळवी, तनिष्का दळवी, तर आर्या यशराज जाधव, सई रोकडे, श्लोक सुळे, वैष्णवी महत, ज्ञानेश्वरी जाजगे, चिन्मय पाटील, अनन्या मोरे आर्यन दरेकर समर्थ लवट यांना यलो बेल्ट प्राप्त झाले . या सर्व विद्यार्थ्यांचे पालक वर्गातुन अभिनंदन होत आहे .
close