shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री स्वामी समर्थांची १४४ वी पुण्यतिथी भक्ती भावात संपन्न


प्रतिनिधी : स्वामीनाथ हरवाळकर

अक्कलकोट : ३०/  श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटद येथे स्वामींच्या मठामध्ये दर्शनाला नियमित मोठी गर्दी असते. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना करतात.

 पौराणिक आधारानुसार, स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली.

भगवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे पूर्णावतार म्हणून अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातीलप अक्कलकोट येथे स्वामींच्या मठामध्ये आज पुण्यतिथी निमित्त दर्शनाला महाराष्ट्र, गोवा,आंध्र,कर्नाटकातून भक्तांची मोठी गर्दी झाली होती. यासोबतच महाराष्ट्रभरातील स्वामी भक्त स्थानिक मठांमध्ये जाऊन स्वामींची आराधना केली. 

       श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, यंदा प्रहर आणि पारायणे सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.पौराणिक आधारानुसार,स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील 'वटवृक्ष समाधी मठ स्थानी' माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली. भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती व तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज दोघांचीही अवतार समाप्ती व प्रगट होण्याची जागा एकच कर्दळीवन होय. दोन्ही अवतार दत्त गुरुंचेच याच स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आज  गुरुवार २८ एप्रिल रोजी समाधी मठ, वटवृक्ष मंदिर,अन्नदान मंडळात  सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत प्रहर आणि पारायणे करून सेवेकऱ्यांच्या सहभागानेच संपूर्ण पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.
close