आज भारतीय जनता पक्ष करणार पक्षवाढीसाठी सुरुवात.
-इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाची आज होणार कार्यकारणी जाहीर -शरद जामदार
इंदापूर प्रतिनिधी: दि. 30 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजता इंदापूर अर्बन बँकेमध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणी जाहीर होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
युवा मोर्चा, महिला आघाडी तसेच सर्व सेल पदाधिकारी यांची निवड होणार आहे.
तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्या अडीच वाजता इंदापूर अर्बन बँकेमध्ये कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष शरद जामदार व शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी केले.

